दोन माणसं एकत्र आले की, मतभेद होतात. कधी कधी या मतभेदांचं रुपांतर वादात होतं तर कधी नात्यामध्ये दुरावा निर्माण होईल. अशावेळी प्रत्येकाने वागताना काही ठराविक गोष्टींचा विचार करायला हवा. जसे की, कोणत्या गोष्टी बोलताना टाळाव्यात किंवा आपला स्पष्टवक्तपणामुळे समोरच्या व्यक्तीला किती दुखावता याची काळजी घ्या. अशावेळी नातेसंबंध बिघडवणाऱ्या गोष्टी ठरवून टाळाव्यात. 


समोरच्या व्यक्तीच्या मताला किंमत न देणे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा आपण सहज वागताना समोरच्या व्यक्तीच्या मताला किंमत देत नाही. या गोष्टीमुळे तुमचे नातेसंबंध बिघडवण्यास कारणीभूत ठरते. समोरच्या व्यक्तीच्या भावनांना आणि मताचा आदर करावा. समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नांना, समस्यांना महत्त्व द्यावं. त्याला क्षुल्लक समजून दुर्लक्ष करु नका. 


अपमानास्पद भाषा वापरणे 


अनेकदा वादात एकमेकांना अपमानास्पद भाषा वापरली जाते. कारण वाद, मतभेद समजुतीने न मिटवणे हा एक मोठा गुन्हा आहे. अनेकदा नात्यामध्ये स्पष्टता नसल्यामुळे नातं या पातळीवर पोहोचते. तसेच मनातील गोष्टी स्पष्टपणे न सांगितल्यामुळे मतभेद होतात. 


चुकांची जाणीव नसणे 


नातेसंबंधात वाद होणे हे अगदी सहज असू शकते. पण वाद झाल्यावर किंवा आपण एखादी चूक केल्यावर त्याबद्दल दिलगिर नसणे ही मोठी चूक आहे. कारण वाद झाल्यावर दिलगिरी व्यक्त न केल्यामुळे तो वाद आणखी विकोपाला जाऊ शकतो. अनेकदा आपण कळत नकळत समोरच्या व्यक्तीला दुखावत असतो. अशावेळी जोडीदाराशी संवाद महत्त्वाचा ठरतो. 


समोरच्या व्यक्तीला Force करणे 


आपण आणि आपले विचार समोरच्या व्यक्तीवर लादणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. यामुळे तुमचं नातं बिघडू शकतं. अशावेळी वाद विकोपाला पोहचू शकतात. नात्यामध्ये कधीच दुरावा नसावा असं वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीचं व्यक्ती स्वतंत्र्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण वागतो तेच योग्य आहे हा समज अतिशय घातक आहे. कारण यामुळे तुमच्यामध्ये एक सुपिरियर भावना निर्माण होते जी तुमच्या नात्यासाठी अतिशय घातक असते.


मोकळेपणाने न बोलणे 


प्रत्येक नात्यामध्ये मोकळेपणा अतिशय महत्त्वाचा आहे. अशावेळी जर तुम्ही तुमच्या भावना आपल्या जोडीदाराला मोकळेपणाने बोलून दाखवल्या नाहीत तर वाद होण्याची शक्यता असतो. अशावेळी आपल्याला एखाद्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? हे बोलून दाखवणे अत्यंत गरजेचे असते. कारण संवाद हा तुमचा अर्धा गैरसमज दूर करु शकतो. अशावेळी कोणत्याही नात्यामध्ये मोकळेपणाने बोलणे अतिशय खास असते.