Baby Names : मान्सून ऋतुमध्ये जन्मलेल्या मुला-मुलींसाठी नावे आणि अर्थ
Monsoon Baby Names : मान्सून हा आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचा ऋतू. या ऋतुत जन्माला आलेल्या मुला आणि मुलांसाठी खास नावे आणि अर्थ.
जून महिना संपत आलाय. मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची सुरुवात झाली आहे. अगदी हवा तसा पाऊस नसला तरीहे वातावरण तुम्हाला आल्हाददायी वाटतं. अशा वातावरणात तुमच्या घरी चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर त्यासाठी मान्सून बेबी नेमचा विचार करायला काहीच हरकत नाही. अनेक पालक मुलांना ऋतुनुसार नावे देतात. अशावेळी पावसावरुन मुलगा आणि मुलगी यांची दोन आणि तीन अक्षरी नावे आणि त्याचे अर्थ समजून घ्या. मुलांसाठी खालील नावांचा नक्की विचार करा.
मेघ
जर पावसाळ्यात तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तुम्ही त्याचे नाव मेघ ठेऊ शकता. 'मेघ' या शब्दाचा अर्थ आहे ढग. मेघ हे अगदी छोटे आणि सुंदर नाव आहे.
वर्शल
पावसाच्या वातावरणात जर तुमच्या घरी मुलाने जन्म घेतला तर त्याचे नाव तुम्ही वर्शल ठेवू शकता. वर्शल म्हणजे वर्षा. हे खूप सुंदर नाव आहे.
श्रावण
पावसाळा म्हटलं की श्रावण महिना असतो. अशात श्रावण महिन्यात तुमच्याकडे मुलगा जन्माला आला असेल तर त्याचे नाव तुम्ही श्रावण ठेवू शकता.
(हे पण वाचा - निसर्गातील युनिक नावे मुलांसाठी ठरतील खास, कायम राहिल वसुंधरेचा कृपाशिर्वाद)
मुकिल
मुकिल हे नाव सुद्धा खूप सुंदर आहे. मुकिल या शब्दाचा अर्थ होतो ढग. तुम्ही हे तीन अक्षराचे नाव सुद्धा ठेवू शकता.
इंद्रनील
पावसाळ्यात अनेकदा आकाशात इंद्रधनुष्याचे दर्शन होते. यावरुन तुम्ही तुमच्या मुलाचे इंद्रनील हे खास नाव ठेवू शकता. याशिवाय या नावाचा अर्थ इंद्र (इंद्रदेव) आणि नील (शिवजी) असाही होतो.
वरुण
वरुण म्हणजे पाऊस. पाण्याचा देवता म्हणून वरुण राजाला ओळखलं जातं. पावसात जन्मलेल्या मुलासाठी खास नाव.
(हे पण वाचा - जो ऋतु सर्वाधिक आवडतो त्यावरुनच ठेवा मुलांची नावे, पाहा यादी)
इंद्र
इंद्रनीलप्रमाणेच तुम्ही इंद्र नावाचा विचार करु शकता. पाऊस आणि विजांचा कडकडाट असा याचा अर्थ आहे.
पावसावरुन मुलांची नावे
श्रावणी
ज्याप्रमाणे श्रावण महिन्यात जन्माला आलेल्या मुलाचे नाव श्रावण ठेवू शकतो त्याप्रमाणे मुलीचे नाव तुम्ही श्रावणी ठेवू शकता. जुळी मुलं असतील तर 'श्रावण' आणि 'श्रावणी' असं नाव निवडू शकता.
मेघना
मेघना या शब्दाचा अर्थ होतो ढगं. मेघना हे नाव अतिशय युनिक आहे. मेघना हे नाव अतिशय सामान्य नाव आहे.
सरी
जर तुमच्या घरी छोट्या चिमुकलीने जन्म घेतला असेल तर तुम्ही तिचे नाव सरी ठेवू शकता. सरी हे नाव नक्कीच तुम्ही निवडू शकता.
वृष्टी
वृष्टी म्हणजे पाऊस. पावसाळ्यात जन्मलेल्या मुलीचे नाव तुम्ही वृष्टी सुद्धा ठेवू शकता. हे युनिक नाव मुलीसाठी अतिशय खास आहे.
अमाया
अमाया शब्दाचा अर्थ रात्रीचा पाऊस असा होतो. हे अतिशय युनिक असं नाव आहे. अमाया नावाचा विचार मुलीसाठी करु शकता.
केया
केया हे एक पावसाळी फुल आहे. पावसाळ्यात जन्मलेल्या मुलीसाठी या नावाचा विचार करु शकता. पालकांना फुलं आणि मान्सून असं कॉम्बिनेशन आवडत असेल तर खालील नावाचा विचार करायला हरकत नाही.