Beauty Hacks : हिवाळा आला की कडाक्याची थंडी जेवढी हवी हवी वाटते तेवढी ती आपल्या आरोग्यावरही परिणाम करते. हिवाळ्यात सर्दी आणि खोकला होणे ही साधारण बाब आहे. सर्दी झाली की घरात आईसोबत सगळेच मंडळी विक्स लाव म्हणतात. खरं तर भारतातील प्रत्येक कुटुंबात विक्स जसा घरातील एक अविभाज्य घटक असतो. सर्दी आणि डोकेदुखीसाठी विक्स हा रामबाण उपाय आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की विक्स फक्त सर्दी, खोकल्यावर नाही तर सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर आहे. याबाबतची माहिती Wix वेबसाइटवरही देण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्स व्हेपोरबमध्ये असलेले मेन्थॉल शरीरातील कोणत्याही प्रकारच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यास मदत करते. पण तुम्हाला माहित आहे का की या विक्स व्हेपोरबमध्ये तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स लगेच नाहीसे करण्याची क्षमता आहे. यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे. मुरुमांपासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. विक्स व्हेपोरबचा वापर आठवड्यातून एकदा केल्यास मुरुम आणि सुरकुत्यापासून आराम मिळतो.


Vicks Vaporub चे चमत्कारिक फायदे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहेत. तुम्ही झोपायला जात असाल किंवा जागे असाल तेव्हा तुमच्या मुरुमांवर विक्स लावा. सर्व प्रकारच्या पिंपल्सवर विक्सचा समान प्रभाव पडतो. जर तुम्हाला मुरुमांसोबत वेदना होत असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता. एवढंच नाही तर चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डागांवरही ते तितकेच फायदेशीर आहे.


विक्स मुरुम, डाग आणि ब्लॅकहेड्ससाठी फायदेशीर आहे. त्याशिवाय त्वचेवर जखम किंवा कापण्यासाठी औषध म्हणून देखील वापरले जाते. प्रभावित भागावर विक्स लावल्याने संसर्ग होण्याची शक्यता नसते आणि जखम लवकर बरी होते. हिवाळ्यात हात-पाय फुटण्याची समस्याही उद्भवू लागते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी विक्स टाचांवर चोळा, सुती मोजे घाला आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा.


विक्समध्ये एक विशेष प्रकारचे तेल असते. चेहऱ्यावरील ताणामुळे निर्माण होणारे डाग विक्स सहज काढून टाकतात. पण विक्सने कधीच याबद्दल काहीही सांगितलं नाही. विक्सची खास गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराच्या कोणत्याही मजबूत भागावर छोटासा कट झाला असेल आणि रक्तस्त्राव थांबत नसेल. म्हणून तुम्ही विक्समध्ये थोडे मीठ मिसळा आणि ते कापलेल्या भागावर लावा. रक्तस्त्राव त्वरित थांबेल.


कसे वापरावे?


ते वापरण्यासाठी, तुम्हाला फक्त एक कापूस आणि विक्स व्हेपोरब लागेल. कापसावर काही विक्स लावा आणि पिंपल्सवर लावा. या उपायाचा परिणाम काही दिवसातच तुमच्या चेहऱ्यावर दिसून येईल.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)