100 वर्षांची परंपरा असलेला माहिम दर्गा उरुस; मुंबई पोलिसांना उरुसाची पहीली चादर चढवण्याचा मान

Mahim Urs 2024 :  100 वर्षांची परंपरा असलेला माहिम दर्गा उरुसची मुंबईकर आतुरतने वाट पाहत असतात.   

| Dec 16, 2024, 20:03 PM IST

Mahim Urs Hazrat Makhdoom Shah Baba Dargah Mahim : 100 वर्षांची परंपरा असलेला माहिम दर्गा उरुस सुरु झाला आहे.  मखदूम शाह बाबाच्या  दर्ग्यावर उरुसाची पहीली चादर चढवण्याचा मान  मुंबई पोलिसांना असतो. या उरुसला मोठी गर्दी असते. देशभरातून हजारो लोक यात सभागी होतात. 

1/7

आज ज्या ठिकाणी माहीम पोलिस स्टेशन उभं आहे, तिथंच पीर मखदुमशाह बाबा यांची बैठक होती असा इतिहास आहे असं सांगितलं जातं. 1923 मध्ये माहीम पोलीस ठाणे स्थापन झाले होते आणि त्यामुळं 100वर्षांहून जास्त काळ ही परंपरा चालत आली आहे.  

2/7

दहा दिवस साजरा होणारा माहीमच्या हजरत पीर मखदुम शाह बाबा दर्ग्याचा उरुस  यंदाही उत्सहात साजरा केला जातो.   

3/7

यावेळी मुंबई पोलिसांचे बँड पथकही सहभागी होऊनन आपली खास सलामी देतात.

4/7

माहीम पोलीस स्टेशनमधून दरवर्षी वाजत गाजत मुंबई पोलीस बाबांची चादर घेऊन संपूर्ण माहीमला फेरी मारुन बाबांच्या दर्ग्यात चादर चढवतात. 

5/7

पीर मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरुसाची पहिली चादर चढवण्याचा मान मुंबई पोलिसांचा आहे. 

6/7

माहिम दर्ग्याच्या उरूसाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडून मखदूम शाह बाबाच्या  दर्ग्यावर उरुसाची पहीली चादर चढवण्याचा मान पूर्ण करण्यात आला.   

7/7

उरुसाच्या 10 दिवसांत देशभरातून मानाच्या चादर दर्ग्यात येत असतात. त्यात मुंबई पोलीस  चादर चढवतात ते सर्वाचं आकर्षण असते.