Diary Writing Benefits in Marathi: टीव्ही विकसित होण्याआधीच्या काळात जेष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांचं दर्जेदार लिखाण वाचणं हा सहसा तेव्हाच्या काळातील लोकांचा आवडीचा छंद असायचा. विरंगुळ्याचं इतर कोणतंही साधन नसल्याने वेगवेगळ्या साहित्याचं वाचन आणि लिखाण करणं हा बऱ्याच जणांचा आवडीचा विषय असायचा. या साऱ्यामुळे विचरांत प्रगल्भता आंणि लिखाणासाठी शब्द संपदा वाढत असे. वाण-सामानाची यादी, खर्चाचा हिशेब किंवा दूर कोणी राहणाऱ्या जवळच्या व्यक्तीला लिहिली जाणारी पत्र यांमुळे का होईना लोकांना  लिहिण्याची सवय होत होती. लिहीण्य़ाच्या सवयीमुळे शब्द रचना लेखनकौशल्य तर वाढतच मात्र त्यासोबतच लिहिण्याची सवय तुम्हाला मानसिक नैराश्यापासून दूर राहण्यास मदत करते. कसं ते जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते 


रोजनिशी लिहिल्यानं तुमच्या मनावरील तणाव  कमी होतो, असं तज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक छोट्या मोठ्या समस्यांना प्रत्य़ेक जण सामोरा जात असतो.माणूस हा समाजप्रिय प्राणी असून तो एकटा राहू शकत नाही. या स्पर्धेच्या युगात अनेक जण मानसिकदृष्ट्या एकटे पडतात.मनात असलेला राग, दुख:, आनंद आणि तणाव व्यक्त करण्याकरता, बोलण्याकरता प्रत्येक वेळी माणसं जवळ नसतात. त्यामुळे नैराश्यात जाण्याचा धोका अधिक असतो. मात्र जर तुम्हाला डायरी लिहिण्याची सवय असेल तर ही सवय तुमच्या यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली ठरते.  मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांचा माणूस अतिविचार करतो,त्यामुळे वाईट घटनांचा मनावर आणि शरीरावरही गंभीर परिणाम होतो. म्हणूनच  डायरी लिहिण्यास सुरूवात केली तर अतिविचार न करता माणसाचा स्वत:शी संवाद घडू लागतो. 


क्रिएटीव्हीटी 
एखादा प्रसंग, एखाद्या ठिकाणाला दिलेली भेट, ते ते क्षण काही जणं फोटोत कैद करतात तर काही जण आपल्या डायरीत नोंद करून ठेवतात. डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे तुमची क्रिएटीव्हीटी वाढण्यास मदत होते. मोठ मोठे व्यावसायिक हे त्यांच्या करियरमधील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ते डायरीमध्ये आपले टार्गेट्स लिहून ठेवतात. यशस्वी करीयर करण्याकरीता सातत्य आणि शिस्त फार महत्त्वाची असते. लिहिण्याच्या सवयीमुळे आयुष्यात काय करावं आणि काय करू नये याचे निर्णय घेण्यासाठी मदत होते. 


स्मरणशक्ती वाढण्यास मदत 
मानवी मेंदूमध्ये  एकावेळी अनेक विचार सुरू असतात, त्यामुळे याचा परिणाम स्मरणशक्तीवर ही होतो. जर तुम्ही रोज डायरी लिहित असाल तर तुमची स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते. डायरीमध्ये तारीख आणि वर्ष नमुद असल्याने ठराविक लिखाण कधी लिहिलं याची माहिती राहते. त्यामुळे रोज डायरी लिहिण्याची सवय तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मदत करते.