पाणी पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीये का? `या` 4 परिस्थितीत पिऊ नका पाणी
Best Time to Drink Water : पाणी हे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असतं असं सांगितले जाते. पण तुम्हाला माहितीय का पाणी पिण्याची ही योग्य वेळ आणि पद्धत असेत. जर तुमची पण पाणी पिण्याची वेळ आणि पद्धत चुकतं असेल तर ही बातमी नक्की जाणून घ्या...
Drinking Water at the Right Time in Marathi : पाणी म्हणजे जीवन मानलं जातं. पाणी हा शरीराचा अत्यंत आवश्यक घटक आहे. पण तुम्ही गरज नसताना तसेच चुकीच्या वेळी पाणी पियाला तर पाण्याचे फायद्या ऐवजी दुष्परिणाम दिसून येतील. म्हणूनच पाणी पिणे ही एक मोठी गोष्ट आहे, विशेषत: पाणी कधी पिऊ नये याची खबरदारी घेणं गरजेचे आहे. अनेकदा आपण बाहेरुन आल्यानंतर ही लगेच पाणी पीत असतो. पण असं पाणी पिणं हे एकप्रकारचं शरीरासाठी घातक ठरु शकतं.
आरोग्य तज्ञ्जांचे मते, जास्त पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि रक्त प्रवाह सुरळीत ठेवते. काहीही खाण्यासाठी आणि पिण्यासाठी योग्य वेळ आणि पद्धत आहे. पण अनेकजण कधीही आणि चुकीच्या पद्धतीने पाणी पितात. त्यामुळे पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत तुम्हाला माहित असणं महत्त्वाचे आहे. कारण पाणी पिण्याची चुकीची पद्धत ही शरीरिसाठी घातक ठरु शकते. पाणी कधी, किती आणि कसे प्यावे? हे जाणून घ्या...
पाण्याचे कमतरचे परिणाम
पाण्याच्या कमतरतेमुळे मायग्रेन, अपचन, उच्च रक्तदाब, किडनी स्टोन, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, सायनुसायटिस, फुफ्फुसाचा क्षय अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच दिवसभर पाणी का पित राहावे हे महत्त्वाचे आहे.
एकदम पाणी पिऊ नका
अनेकजण बऱ्याच वेळ पाणी पित नाही मग अचानक तहान लागल्यावर एका दमात पाणी पितात. हीच सवय शरीरासाठी घातक ठरू शकते. एकावेळी जास्त पाणी प्यायल्याने मूत्रपिंड, यकृत आणि हृदयावर नकारात्मक परिणाम होतात. त्यामुळे एकाच वेळी भरपूर पाण पिऊ नका.
जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये
काहीजण जेवताना पाणी पितात, तर काहीजण जेवून झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणं शरीरिसाठी योग्य आहे. पण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं हे आरोग्याच्या दृष्टीकोनातून एक वाईट सवय आहे. पाणी प्यायल्यानंतर अर्धा लिटर पाणी प्या. जेवताना आणि नंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीराला अन्न पचण्यास त्रास होतो.
व्यायामानंतर पाणी पिऊ नये
व्यायाम केल्यानंतर शरीरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे थकवा जाणवणे साहजिकच आहे. म्हणून जिममध्ये व्यायामाच्या आधी पाणी पिण्याचा सल्ला देतात. किंवा व्यायामाच्यामध्ये थोडेसे पाणी प्यावे. व्यायामामुळे शरीर खूप गरम होते. त्यामुळे एकाच वेळी जास्त पाणी पिणे योग्य नाही.पाणी पिण्याऐवजी नारळ पाणी किंवा ज्यूस प्या. पण व्यायामानंतर लगेच पाणी पिऊ नका.
लघवीला रंग नसेल तर
दिवसभरात किती पाणी प्यावे हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या लघवीचा रंग तपासा. जर रंग पूर्णपणे पांढरा झाला असेल तर समजावे की तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुरेसे पाणी पीत आहात. तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात. जर रंग गडद पिवळा असेल तर समजावे की शरीरात पाण्याची कमतरता आहे. आपण दररोज 3 लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावे.
सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?
- झोपेतून उठल्यावर किमान 650 मिली (3 कप) पाणी प्यावे.
- 650 मिली पाणी प्यायल्यानंतर, किमान 45 मिनिटे नाश्ता करणे किंवा काहीही खाणे टाळावे.
- दिवसर असचं पाणी प्यावे.
- जेवणाच्या 30 मिनिटे आधी पाणी प्यावे.
- जेवणानंतर दोन तास (नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण) पाणी पिऊ नका.