Pubic Hair Removal Tips : येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आहे. त्यामुळे तरुणी आणि महिलांच्या हौशीला मोल नसणार आहे. नवीन कपड्यांसह दागिन्यांची खरेदीवर त्यांचा भर असणार आहे. त्यात दिवाळी सुंदर दिसण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाभन आयब्रो, क्लीनअप, फेशियलसह हातापायाचे वॉक्सिंग करणार. पण तुम्ही नाजूक जागेवरचेही केस काढणार असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. (bikini wax for the first time removing hair from sensitive private part Skin Care Tips in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाजूक जागेच्या केसांना प्यूबिक हेअर्स किंवा बिकिनी वॅक्स असं म्हटलं जातं. नाजूक जागेवरील केस अर्थात प्यूबिक हेअर्स एका ठराविक वेळेनंतर ट्रिम करणे गरजेचं असतं. पण त्याबद्दल आजही हवं त्या प्रमाणात जागृता नाही. अशात प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं. यामुळे अनेक इन्फेक्शनचा धोका निर्माण होतो. 


बिकिनी वॅक्स करण्याचा योग्य मार्ग


बिकिनी वॅक्स करण्यासाठी सर्वात पहिले बिकिनी भागावर कोणतेही अँटीसेप्टिक क्लिन्जर लावावे. यानंतर, केसांच्या वाढीच्या दिशेने स्पॅच्युलासह त्या ठिकाणी वॅक्स लावावे. केसांच्या विरुद्ध दिशेने वॅक्स पट्टी ओढावी. वॅक्सची पट्टी ओढल्यानंतर तो भाग हाताने दाबा आणि ओल्या कापडाने तो भाग स्वच्छ करावा. शेवटी त्या भागावर कोरफड जेल लावावे.


बिकिनी वॅक्स करताना या गोष्टी लक्षात ठेवा


केसांची वाढ


बिकिनी वॅक्स करण्यासाठी सर्वपहिले बिकिनी क्षेत्रातील नको असलेल्या केसांची वाढ तपासा. हे केस खूप मोठे असल्यास असल्यास थेट वॅक्स लावू नका. वॅक्सिंग करण्यापूर्वी केस कात्रीच्या मदतीने ट्रिम करुन घ्या.


पीरियड्स टाळावे


पीरियड्स दरम्यान बिकिनी वॅक्सिंग करणे टाळावे. यावेळी तिथली त्वचा अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे अशा वेळी वॅक्सिंग केल्याने दुखण्यासोबत संसर्गाचा धोकाही वाढू शकतो. याशिवाय बिकिनीच्या आजूबाजूच्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन, पुरळ किंवा खाज असल्यास वॅक्सिंग करणेही टाळावे.


वॅक्स निवडताना काळजी घ्यावी


बिकिनी वॅक्सचे दोन प्रकार आहेत, पहिला मऊ आणि दुसरा कडक. वेदना टाळण्यासाठी तुम्ही सॉफ्ट वॅक्स वापरू शकता आणि नको असलेले केस जास्त काळ घालवण्यासाठी हार्ड वॅक्स वापरू शकता.


आपली हेअर रेमूव्हल किटची काळजी


तुम्ही वापरलेली शेव्हिंग किंवा वॅक्सीनची साधन स्वच्छा ठेवा आणि इतरांना वापरल्याला देऊ नका आणि तुम्हीसुद्धा इतर कोणाची वापरू नका. कारण इतरांनी वापरलेलं तुम्ही वापरलात तर तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. शिवाय लैंगिक संसर्गसुद्धा होण्याची भीती असते. 


इन्फेक्शन टाळण्यासाठी असे करा बिकिनी वॅक्स 


इन्फेक्शन, जळजळ किंवा सूज टाळण्यासाठी बिकिनी वॅक्स केल्यानंतर लगेचच त्वचेवर कोरफड जेल किंवा मॉइश्चरायझर लावावे.


बिकिनी वॅक्स मिळाल्यानंतर, तीव्र जळजळ झाल्यास, बर्फ किंवा थंड पाणी लावावे.


वॅक्सिंगनंतर घट्ट कपडे घालणे टाळा.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)