If You Want Job Slove This Brain Teaser: ब्रेन टीझर्स हे नेटवर टाइमपास करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहेत. थोडं डोकं लावावलं लागणारा हा प्रकार प्रचंड व्हायरल होणाऱ्या कंटेटंपैकी एक आहे. अर्थात ब्रे टीझर्स ही डोक्याला ताण देण्याबरोबरच हुशारी तपासण्यासाचं उत्तम माध्यम असल्याचं मानलं जातं. खास करुन आकडेमोडीसंदर्भातील भन्नाट ब्रेन टीझर्सवर तर अनेक मतभेद दिसून येतात. म्हणजे अमुक एका गणिताचं उत्तर काय असेल याचा अंदाज व्यक्त करण्याचं चॅलेंज स्वीकारणाऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस अशा गणितासंदर्भातील ब्रेन टीझर्सच्या खाली दिसतो. 


नोकरी हवी तर बरोबरच उत्तर द्या, माझ्या 6 वर्षाच्या मुलीने 30 सेकंदात दिलं उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या रेडइट या सोशल नेटवर्किंगवर अशाच एका ब्रेन टीझर्सची चर्चा आहे. बॅक फॉर ब्रेकफास्ट नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये डीनो डिऑनींनी घातलेलं एक गणित दिसत आहे. डीनो हे जिनिअस कॅपिटल ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या पोस्टमध्ये डीनो डिऑनी यांनी आपल्याकडे नोकरीसाठी येणाऱ्या प्रत्येकला हे कोडं घालतो असा दावा केल्याचं सांगण्यात आलं आहे. "तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्ही तीन सेंकंदांमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या, असं सांगितल्यावर अनेक वायफळ कारणं मी समोरच्या व्यक्तींकडून ऐकली आहेत. अनेकांनी चुकीची उत्तरं दिली आहेत. एकालाही याचं बरोबर उत्तर आलं नाही. माझ्या 6 वर्षाच्या मुलीने अवघ्या 30 सेकंदात याचं उत्तर दिलं आहे," असं या सीईओचं म्हणणं असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. 


सध्या हे गणित चर्चेत आहे


नेमकं गणित काय आहे हे तुम्हाला वरील फोटोमधून समजलं असेल. तर प्रश्न फार सोपा आहे, 3×3-3÷3+3 या गणिताचं योग्य उत्तर काय? केवळ हुशार लोकांनाच उत्तर देता येईल असा दावा करण्यात आला आहे. हे एकाच आकड्याचा चारवेळा समावेश असणारं सोपं दिसणारं कठीण गणित सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


हजारो कमेंट्स


या पोस्टला एकूण 2.9 हजार लाइक्स आहेत. त्यावर 3411 कमेंट्स आहेत. अनेकांनी वेगवेगळी उत्तर दिली आहे. 'मला हे साधं गणित जमत नाही, याचं आश्चर्य वाटतंय', असं एकाने म्हटलं आहे. "अवघ्या 3 सेकंदांमध्ये याचं उत्तर कसं द्यायचं? ही मागणी फारच चुकीची वाटते," असं अन्य एकाने म्हटलंय. 



योग्य उत्तर काय?


गणितामधील BEDMAS नियमानुसार आधी कंस सोडावायचा, मग विस्तार, मग भागाकार, मग गुणाकार त्यानंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी असा नियम आहे. त्यामुळेच 3×3-3÷3+3 चा विचार केल्यास यामध्ये कंस नाही किंवा विस्तरही नाही. मात्र यात भागाकार आणि गुणाकर आहे. गणित सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवतात. त्यामुळे आधी 3×3 सोडवल्यास 9 उत्तर मिळतं. मग हे गणित 9-3÷3+3 असं होईल. यानंतर नियमानुसार 3÷3 सोडवल्यास 1 उत्तर मिळतं. मग हे गणित 9-1+3 असं होईल. बेरीज वजाबाकी सोडवताना डावीकडून उजवीकडे सोडवतात. त्यामुळेच 9 वजा एक 8 उत्तर येणार त्यात 3 ची बेरीज केल्यास 11 उत्तर येतं. गुगलवर थेट हे गणित सर्च केलं तरी 11 उत्तर दिसतं.