Chanakya Niti For Students : आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. सोबतच ते सल्लागार, शिक्षक, अर्थशास्त्री देखील होते. त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय ज्याचं नाव आहे 'चाणक्य नीति.' मुलांचं जीवन यशस्वी असावं असं वाटत असेल तर चाणक्य नीतिमधील 5 गोष्टी मुलांना शिकवा. 


लक्ष्याकडे असू दे लक्ष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाणक्य नीतीनुसार, मुले आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे ध्येय कधीही विसरू नये. त्यांनी ते नेहमी गांभीर्याने घेतले पाहिजे. ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे, तरच जीवनातील यशाचा मार्ग सुकर होईल आणि भविष्य चांगले होईल. लक्ष्य कायम मुलांच्या डोळ्यासमोर असावे. यासाठी त्यांनी त्याचा मागोवा घ्यायला हवा. पालकांनी देखील मुलांना शिकवा या गोष्टी. 


चुकीची जीवनशैली 


मुलांनी त्यांचे जीवन संघटितपणे जगले पाहिजे. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असावी. ज्याप्रमाणे संत नेहमी ध्यानात मग्न असतात, त्याचप्रमाणे मुलांनाही शिक्षण मिळाले पाहिजे.मुलांनाही कायमच चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करायला लावावा. कारण चुकीची जीवनशैली हे यशस्वी जीवन गाठण्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. 


सकाळी लवकर उठणे


चाणक्य नीतिनुसार, मुलांना सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठवणे, स्नान करायला लावणे. ही वेळ अभ्यासासाठी सर्वोत्तम असते. त्यामुळे मुलांना पाठांतर लवकर होते. सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. मानसिक शांती देखील महत्त्वाची ठरते. सकाळी लवकर उठून मुलांना व्यायाम करण्यास सांगावे. कारण सकाळी लवकर उठण्याची एकदा सवय लागली तर तुम्हाला मुलांना भविष्यात ही गोष्ट सांगावी लागणार नाही. 


वेळेचा सदुपयोग 


कोणत्या वेळी काय करावे हे मुलांनी शिकणे फार महत्वाचे आहे. तरच यश मिळवणे सोपे होईल. विद्यार्थ्यांनी त्यांचे काम वेळेवर केले तर यश मिळण्याची शक्यता खूप वाढते. वेळेच प्रॉपर प्लानिंग करुन जर दिनक्रम बनवला तर जीवनात यश संपादन करण्यास मदत होईल.


योग्य आहार 


विद्यार्थ्याने नेहमी पौष्टिक व संतुलित आहार घ्यावा. यामुळे शरीर निरोगी राहते आणि यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरोगी शरीर. मुलांना लहान वयातच जंक फूड खाण्याची सवय लागते अशावेळी मुलांना चांगल्या खाण्याच्या सवयी लावा. 


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)