Best food for weight loss: वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रवासात आहारला खुप महत्त्व आहे. कारण वजन वाढण्यासाठी जीवनशैलीसोबतच तुम्ही काय खाता-पिता हे ही एक मोठे कारण आहे. यामुळे जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा सगळ्यात पहिले तुम्ही खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये भात आणि चपातीचा सर्वाधिक वापर केला जातो. काही लोक सकाळी नाश्त्यात चपाती किंवा पराठा आणि दुपारी भात खातात. तर काही रात्री भात खाणे पसंत करतात. भात आणि चपाती खाल्ल्याशिवाय त्यांना जेवल्यासारखे वाटत नाही. पण जर आपण वजन कमी करण्याबद्दल बोलत आहोत, तर आपण या दोघांपैकी काय खायला हवे? भात की चपाती हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण हे ठरवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्याच्या पोषक तत्वे कोणती हे समजून घ्यायला हवीत. 


तांदूळ:
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ मिळतात. जसे ब्राऊन आणि पांढरे. आपण पांढऱ्या रंगाच्या तांदळातल्या पौष्टिक मूल्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जो भारतात सगळ्यात जास्त खाल्ला जातो. 


100 ग्रॅम पांढऱ्या तांदळात-
कॅलरी: 356 kcal
कार्बोहायड्रेट: 78.2 ग्रॅम
प्रथिने: 7.9 ग्रॅम
फायबर: 2.8 ग्रॅम
ग्लायसेमिक इंडेक्स (GI): 70-80 (उच्च)


100 ग्रॅम गव्हाच्या चपातीमध्ये - गव्हाच्या पिठापासून चपाती बनवली जाते.
कॅलरी: 320kcal
कार्बोहायड्रेट: 64.17 ग्रॅम
प्रथिने: 10.5 ग्रॅम
फायबर: 11.3 ग्रॅम
ग्लायसेमिक इंडेक्स (GI): 55-60 (मध्यम)


वजन कमी करण्यासाठी काय खावे:


चपातीमध्ये भातापेक्षा जास्त कॅलरीज असतात. म्हणजे चपाती कमी खाल्ली तरी समाधान वाटते. भातामध्ये चपातीपेक्षा कमी पौष्टिकता असते, त्यामुळे तुम्ही भरपूर भात खाता आणि त्यानंतरच तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते. यामुळे शरीरात जास्त कॅलरीज जमा होतात. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. 


रोटीमध्ये फायबर आणि प्रोटीनही जास्त प्रमाणात असते. फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि त्यामुळे पचनक्रियाही सुधारते. याशिवाय फायबर रक्तातील साखरंही नियंत्रित ठेवते. चपातीमध्ये असलेले प्रोटीन वजन कमी करताना स्नायूंसाठीही पोषक असतात. भातामध्ये फायबर आणि प्रोटीन दोन्हीही कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भात चुकीचा पर्याय ठरू शकतो.


सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोटीचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) मध्यम असतो. तर भाताचा जास्त. ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खरं तर रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढण्यास कारणीभूत ठरतो. वजन कमी करण्यासाठी, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ठीक असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 


तांदूळ हे प्रक्रिया केलेले अन्न आहे आणि गहू कमी प्रक्रिया केलेले आहे. त्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्यही जास्त आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भात आणि चपाती यापैकी निवड करायची असेल तर ती चपाती असू शकते.


पण हे लक्षात घ्या की तुम्ही आहारात फक्त चपाती घेतल्याने तुमच्या वजनात फारसा फरक पडणार नाही. कारण त्यासोबतच तुम्हाला व्यायाम करण्याची आणि जीवनशैली सुधारण्याची गरज आहे.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)