आजची लहान मुले हातात मोबाईल किंवा डोळ्यासमोर टीव्ही न बघता जेवायला मागत नाही. जर मुलांकडून हा फोन काढून घेतलात तर ही मुलं अक्षरशः गोंधळ घालतात. पण मुलांची ही सवय त्यांच्या डोळ्यांनाच नाही तर पोटातील गंभीर त्रासाला देखील जबाबदार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालरोगतज्ज्ञ डॉ.पवन मांडविया यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून या विषयावर चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले आहे की ,अशा परिस्थितीत जिथे मुलाला भूक लागत नाही, त्याला लोहाची कमतरता, पोटात जंत किंवा दात येण्याचा त्रास होऊ शकतो. या परिस्थितीत पालकांनी बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जेवताना मुलाचे संपूर्ण लक्ष मोबाईल किंवा टीव्हीवर असेल आणि त्याला अन्नाचा पोत किंवा त्याची चव इत्यादी समजू शकणार नाही. यासोबतच डॉ. पवन यांनी मुलांमधील ही सवय दूर करण्यासाठी काही टिप्सही दिल्या आहेत, ज्या पुढे स्पष्ट केल्या आहेत.



वातावरण निर्मिती करा 
दिवे मंद करून आणि जेवताना मुलांशी छान गप्पा मारत जेवातानाचा आनंद घ्या. जेवताना शांत आणि आनंददायी वातावरण तयार केले जाऊ शकते. याशिवाय कुटुंबासोबत बसूनच भोजन करण्याचा नियम करा. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवतात आणि त्यांच्या मोबाईलला कोणी हात लावत नाही.


पालकांनी उदाहरण निश्चित करा 
तुमच्या मुलाला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्ही स्वतः एक आदर्श बनले पाहिजे. तुम्ही स्वतः जेवताना फोन किंवा मोबाईल वापरत असाल तर तुम्हाला पाहून तुमचे मूलही ही सवय लावेल. जेवताना कोणतेही गॅजेट्स जवळ ठेवू नका. याशिवाय जेवणाची वेळ अधिक रंजक आणि आकर्षक बनवण्यासाठी विविध रंगीबेरंगी आणि पौष्टिक पदार्थ मुलांसमोर ठेवा.


जेवण बनवताना मुलांचा समावेश 
तुमच्या मुलाला जेवण तयार करताना सोबत घ्या. कारण जेवण कसे बनवतात हे मुलांना समजावून सांगणे अतिशय महत्त्वाचे असते.  जसे की भाज्या धुणे किंवा शिजवताना साहित्य ढवळणे. त्यामुळे त्याची खाण्यात रस वाढेल आणि तो स्वतःच पदार्थ चाखायला येईल. आपल्या मुलाची भूक नियंत्रित करण्यासाठी आणि त्याचे लक्ष विचलित होण्यापासून रोखण्यासाठी, दररोज खाण्याची वेळ निश्चित करा.


मुलांशी गप्पा मारा 
मुलांशी संवाद साधणे अतिशय महत्त्वाचे असते. अशावेळी मुलांशी जेवण बनवताना आणि जेवताना खास गप्पा मारा. कारण यामुळे मुलांची जेवणातील आवड निर्माण होते. तसेच मुलांची आवड निर्माण करण्यासाठी वरील सर्वच गोष्टी तुम्हाला मदत करतील. 


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)