Christmas 2023 Decoration Idea: नाताळ म्हणजेच ख्रिसमस अगदी काही दिवसांवर आला आहे. ख्रिश्चन बांधवांचा हा सण देशभरात साजरा केला जातो. ख्रिसमसचे खास आकर्षण म्हणजे ख्रिसमस ट्री. बाजारपेठेत आत्तापासूनच ख्रिसमसचे सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे. तुम्हीदेखील घरी ख्रिसमस ट्री सजवण्याचा विचार करताय पण तुम्हाला युनिक आणि भन्नाट आयडिया हव्या असतील तर टेन्शन घेऊ नका. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ख्रिसमस ट्री सजवण्याच्या आयडिया. त्या वापरुन तुमच्या घरात आकर्षक सजावट करु शकता. 


ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी हे सामान आवश्यक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी एक लिस्ट तयार करुन घ्या. यात ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेले सामान आधीच लिहून घ्या. यात सगळ्यात पहिल्या वस्तु या तुम्हाला बाजारातून ज्या वस्तु घ्यायच्या आहेत त्या लिहून ठेवा. रिबन, रंगीबेरंगी लाइट्स, गिफ्ट्स, बॉल्स, डेकोरेटिव्ह पेपर, ख्रिसमस रिंग्स आणि घंटा. 


ख्रिसमस ट्री सजवताना


ख्रिसमस ट्री सजवताना तुम्ही या नवीन आयडिया वापरु शकता. तसंच, तुम्ही डीआयवायदेखील (DIY) करु शकता. नेहमीच्या सोनेरी आणि लाल रंगाव्यतिरिक्त पेस्टल रंगही वापरु शकता. सध्या बाजारात पेस्टल रंग खूप चर्चेत आहेत. त्याचबरोबर टेक्स्चर असलेला वेगळा लुकही देऊ शकता. ख्रिसमस ट्री आणायला तुम्हाला जमलं नसेल तर घराच्या भिंतीवरही तुम्ही DIY ख्रिसमस ट्री बनवू शकता. त्यासाठी हिरव्या रंगाची झालर असलेले सजावटीचे साहित्य भितींवर ट्रीच्या आकारासारखे चिटकवून घ्या. त्यानंतर शेवटी एक गोल्डन स्टार लावा. गरज असलेल्या त्याच्या आजूबाजूलाही छोट्या छोट्या सजावटीचे साहित्य लावू शकता. यामुळं घरातील जागाही अडत नाही आणि दिसायलाही छान दिसते. 


ख्रिसमस ट्रीवर तुम्ही तुमचे फोटोही लावू शकता. पाश्चिमात्य देशांत नाताळ हा मोठा सण आहे. नाताळात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमतात अशावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र जमलेले असताना तुम्ही त्यांना हे खास सरप्राइज देऊ शकतात. ख्रिसमस ट्रीवर पॉलोराइट फोटोंचे कोलाज लावून सजवू शकतात.


फुलांचा वापर करा


ख्रिसमसमध्ये घराला नवा लुक देण्यासाठी फुलांचा वापर करु शकता. ताज्या फुलांबरोबरच सजावटीच्या फुलांचाही तुम्ही वापर करु शकता. दिसायला आकर्षक असलेली फुलं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात.