शेव्हिंग क्रीमचा असाही उपयोग; घरातील कामात असा करा वापर; चुटकीसरशी होतील स्वच्छ
Benefits Of Shaving Cream: शेव्हिंग क्रीमचा वापर तुम्ही घरातील काही कामांसाठीही करु शकता. जे काम करण्यासाठी तुम्हाला तासाभराचा वेळ लागतो ते काम तुम्ही अवघ्या काही मिनिटांत करु शकणार आहात.
Benefits Of Shaving Cream: दाढी करण्यासाठी पुरुष सलूनमध्ये जातात किंवा कधी कधी घरच्या घरीच दाढी करतात. घरीच दाढी करायची असल्यास बाजारात मिळणारे शेव्हिंग क्रीम वापरले जातात. या शेव्हिंग क्रीमने त्वचेला काही नुकसानही होत नाही. पण तुम्हाला हे माहितीये का शेव्हिंग क्रीमचा फायदा फक्त मेन्स ग्रुमिंगपर्यंतच मर्यादित नाहीये. याच्या मदतीने तुम्ही घरातील छोटे-मोठे कामही करु शकतात. शेव्हिंग क्रीमचा वापर तुम्ही घरातील कामात करुन अगदी मिनिटांत ही काम पूर्ण करु शकतात.
घरात शेव्हिंग क्रीम असेल असं शक्यच नाही. तुमचे वडिल, भाऊ किंवा पती तर नक्कीच शेव्हिंग क्रीमचा वापर करत असतील. शेव्हिंग क्रीमचा वापर तुम्ही घरातील साफ-सफाईच्या कामातही करु शकता. आम्ही देत असलेल्या टिप्समुळं तुम्ही अगदी आरामात चिकट डाग काढू शकता. आम्ही देत असलेल्या या टिप्स वापरुन बघाच.
ज्वेलरी साफ करा
सोनं-चांदीचे दागिने तुम्ही दररोज परिधान करतात. मात्र काही वेळानंतर त्याची चमक फिकी पडते. दागिन्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी सोन्या-चांदीचे दागिने शेव्हिंग क्रीमचा वापर करा. तुमच्या दागिन्यांवर शेविंग क्रीम हलक्या हाताने रगडा आणि दहा मिनिटासाठी तसंच ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व कोरड्या फडक्याने पुसून घ्या.
स्टेनलेस स्टीलची भांडी चमकवा
किचनमध्ये असलेली भांड्यात स्टेनलेस स्टीलची भांडी असतातच. ही भांडी नॉर्मल डिशवॉशरने साफ करण्यास खूप वेळ जातो. अशावेळी मिनिटांत ही भांडी साफ करण्यासाठी तुम्ही शेव्हिंग क्रीमचा वापर करु शकता. त्यासाठी एका स्वच्छ कपड्यावर शेव्हिंग क्रीम टाका आणि आता स्टेनलेस स्टील भांडी साफ करा. थोड्याच वेळात ही भांडी लख्ख चमकतील.
कारपेटवरुन डाग हटवा
हॉल किंवा बेडरुममध्ये असलेल्या कार्पेटवरील डाग हटवणे मोठे कष्टाचे काम आहे. वॉशिंग मशीनमध्ये कार्पेट धुतल्यास त्याचे धागे निघण्याची व त्यांचा रंग उडण्याची भीती असते. अशावेळी कार्पेटवरील डाग हटवण्यासाठी सॉफ्ट क्लिनिंग सगळ्यात चांगला पर्याय आहे. अशावेळी कार्पेटवर जिथे डाग लागले आहेत. तिथे शेव्हिंग क्रीम लावा आणि काही मिनिटांसाठी सोडून द्या. त्यानंतर एक टिश्यू पेपर घेऊन साफ करा.
नेल पेंट काढण्यासाठी
तुमच्याकडे नेल पेंट रिमूव्हर नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेव्हिंग क्रीमचा वापर करु शकता. त्यासाठी शेव्हिंग क्रीम तुम्ही दोन ते तीन मिनिटांसाठी नेलपेंटवर लावून ठेवा. त्यानंतर एक सूती कपड्याने नेलपेंट पुसून घ्या.