... पण श्रीकांतने माझे डोळे उघडले, मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक पालकाने शिकावी `ही` गोष्ट
CM Eknath Shinde Emotional : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा एक बाप म्हणून आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. भावना व्यक्त असताना मुख्यमंत्री भावूक झाले.. कणखर बापाची व्यथा पहिल्यांदाच समोर आली आहे. पालकांनी मुख्यमंत्र्यांच्या `या` विधानातून शिकाव्यात अनेक गोष्टी.
Eknath Shinde Parenting Tips : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचया खासगी जीवनातील आजोबांची भूमिका सर्वोत्तम निभावताना आपण पाहिली आहे. अनेकदा ते आपला नातू रुद्रांशसोबत वेळ घालवताना दिसतात. पण कोल्हापुरात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यामधील एक भावूक बाप जनतेसमोर आला. कोल्हापुर शिंदे गटाचे महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला बालपणीची वडिलांसोबतच आठवण सांगता येत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री भावूक झाले.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
लहानपणापासून आम्ही वडील एकनाथ शिंदे यांना कायमच शिवसैनिकांसोबत पाहिलं. त्यामुळे त्यांच्याबाबतची बालपणीची आठवण काही सांगता येत नाही. बालपणी एकनाथ शिंदे यांनी आमच्यासाठी कधीच खास क्षण दिला नाही. त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ नव्हता, असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, तरीही मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे.
बाप एकनाथ शिंदेंच उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दडलेल्या बापाने खासदार आणि मुलगा श्रीकांत शिंदेंना उत्तर दिलं. X वरती ट्विट करत ते म्हणाले की, काल श्रीकांतने माझे डोळे उघडले कारण मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय. मी घरी जायचो तेव्हा सगळे झोपलेले असायचे. पिता-पुत्रांची भेट महिना-महिना होत नव्हती. पुढे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, तो म्हणाला माझ्या बापाचा मला अभिमान आहे, मला देखी त्याचा अभिमान आहे. कारण त्याने माझे डोळे उघडले आहे."
एकनाथ शिंदे यांचं ट्विट
पालकांनी काय शिकावे?
आपण कितीही मोठ्या पदावर असो किंवा व्यस्त असो त्याक्षणी आपण लहान मुलाचे पालक देखील आहोत, याची काळजी घ्यावी. कारण मुलांच हे वय पुन्हा येणार नाही. त्यांच्या बालपणीच्या आठवणीत पालक प्रकर्षाने गडदपणे असणे अतिशय महत्त्वाचे आहे.
पालक म्हणून मुलांना फक्त गरजेच्या गोष्टी, योग्य शिक्षण आणि आहार देणे एवढीच तुमची जबाबदारी नाही. तर पालकांनी मुलांना वेळ देणेही तितकेच गरजेचे आहे. जी चूक मुख्यमंत्र्यांनी केली ती इतर पालकांनी अजिबात करु नये.
एवढंच नव्हे तर पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी, की मुलं काहीच विसरत नाही. आज खासदार श्रीकांत शिंदेही एका मुलाचे पालक आहेत. पण आपल्या वडिलांनी आपल्याला लहानपणी वेळ दिला नाही, ही खंत आजही त्यांच्या मनात सलतेय.
त्यामुळे पालकांनी मुलांना वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. मुलांच्या प्रत्येक चांगल्या आठवणींनी त्यांच बालपण सजवणे ही पालकांची जबाबदारी आहे.