Cooking Tips: `या` भाज्यांमध्ये घालू नकात टोमॅटो, नाही तर संपूर्ण चव होऊ शकते खराब
Cooking Hacks: भारतीय स्वयपांक घरात अगदी प्रत्येक पदार्थात टोमॅटो टाकला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की काही भाज्यांमध्ये टोमॅटो टाकल्याने चव खराब होऊ शकते.
Tomatoes can spoil the taste: कांदा आणि टोमॅटो हे असे पदार्थ आहेत जे अगदी प्रत्येक भाजीत टाकले जातात. सर्व भाज्या बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो असे तुम्हालाही वाटत असेल तर हा गैरसमज लवकरात लवकर दूर होणे गरजेचे आहे. काही भाज्यांमध्ये टोमॅटो टाकू नये. या भाज्या शिजवताना टोमॅटो घालण्याची चूकही करू नका. कारण जर तुम्ही या भाज्यांमध्ये टोमॅटो घातला तर तुमच्या डिशची चव खराब होऊ शकते. चला जाणून घेऊयात अशा कोणत्या भाज्या आहेत.
भेंडी आणि कारलं
भेंडीची भाजी बनवताना टोमॅटोचा वापर करू नये. याशिवाय कारल्यामध्ये टोमॅटोही टाकू नये. भेंडी आणि कारल्यामध्ये टोमॅटो घातल्यास या भाज्यांची चव खराब होऊ शकते. याशिवाय भाजी खराबही होऊ शकते.
आरबीची भाजी
आरबीची भाजी बनवतानाही टोमॅटोचा वापर करू नये. या भाज्यांमध्ये टोमॅटो घालण्याची चूक या भाजीची चव खराब करू शकते.
हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी
पालेभाज्या
अनेकदा पालेभाज्यांमध्ये टोमॅटो घातला जातो. पालक ते मेथी या भाज्या टोमॅटो घालून काही लोक बनवता पण या भाज्या शिजवतानाही टोमॅटोचा वापर करू नये, असे मानले जाते. याशिवाय बीन्सची भाजी बनवताना टोमॅटो घालू नये, अन्यथा पश्चाताप करावा लागू शकतो.
फणस
फणस या फळाची भाजीही बनवली जाते. कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते. पण यामुळे भाजीची चव बिघडू शकते.
बहुतेक भाज्या तयार करताना, भारतीय नक्कीच टोमॅटो घालतात कारण टोमॅटो अनेक भाज्यांमध्ये चव वाढवतात. पण जर तुम्हाला या भाज्या चांगल्या करायच्या असतील तर त्या बनवताना टोमॅटोचा वापर करू नये.