कडत उन्हात कायमच चिल्ड बिअर पिणे पसंत केले जातो. लोकांचं असं म्हणणं आहे की, बिअर प्यायल्याने त्यांचा थकवा पूर्णपणे दूर होतो. एवढंच नव्हे तर बिअरबाबत अनेक दावे देखील केले जातात. असं म्हटलं जातं की, बिअर इतर अल्कोहोलपेक्षा कमी घातक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभ्यासात असं म्हटलं आङे की, बिअर पायल्यावर वय देखील वाढते. तसेच तुम्हाला होणारी दुखापत देखील कमी होते. हृदयाशी संबंधीत अनेक त्रास देखील कमी होतात. पण दररोज बिअर प्यायल्याने शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जर तुम्ही देखील दररोज बिअर पिता तर शरीरावर काय परिणाम होतो, ते एकदा समजून घ्या. 


लठ्ठपणा वाढतो 


बिअरमध्ये अक्लोहोल कमी असते मात्र कॅलरीज भरपूर प्रमाणा असते. रिपोर्टनुसार, बिअरच्या छोट्या बॉटलमध्ये 150 कॅलरीज असतात. अशावेळी तुम्ही जर एकापेक्षा जास्त बिअर प्यायलात तर कॅलरीजचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पोट फुगणे, लठ्ठपणा यासारख्या गोष्टींचा त्रास होतो. 


किडनीवर परिणाम 


मर्यादेपेक्षा सर्वाधिक बिअर प्यायलात तर शरीराला खूप मोठं नुकसान होतं. जास्त बिअर प्यायल्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आणि किडनीचा त्रास अशा समस्या जाणवतात. बिअर प्यायल्याने किडनीवर एक्स्ट्रा दबाव पडतो. तसेच डिहायड्रेशनची समस्येचे कारण देखील बनतात. शरीरातील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो. 


(हे पण वाचा - मद्याचा शरीरावर होणारा परिणाम रोखण्यासाठी खा 'हे' 3 पदार्थ)


पोषकतत्त्वांची कमतरता 


दररोज बिअर प्यायल्याने शरीरातील व्हिटॅमिन आणि मिनरल्स कमी होतात. जर शरीराला आवश्यक तेवढे पोषकतत्त्व मिळाले नाही तर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. दररोज जेवल्याने शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळतात. पण काही प्रमाणात व्हिटॅमिनची कमतरता देखील जाणवते. 


हृदयाचे आरोग्य बिघडते 


काही रिपोर्टनुसार, बिअर प्यायल्यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. दारु प्यायल्यामुळे स्नायूंचे नुकसान होते. ज्यामुळे स्ट्रोक, हाय ब्लड प्रेशर, टाइप-2 डायबिटिस आणि हृदयविकाराचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेख हा शरीरासाठी हानिकारकच ठरतो. 


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)