दीपिका पदुकोणने सांगितला पोस्ट डिलिव्हरीनंतरचा प्लान, Hand on Mom बनण्यासाठी तयार
दीपिका पदुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. सप्टेंबर 2024 मधील दीपिका बाळाला जन्म देईल पण त्याअगोदर तिने आपल्या डिलिव्हरीनंतरचा प्लान सांगितला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या आपल्या बाळाच्या आगमनाची तयारी करत आहे. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय जोडी आहे. दीपिका आणि रणवीरच्या बाळाचा जन्म हा सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसारस दीपिका पदुकोण आता एवढ्यात कोणतंच काम स्वीकारत नाही. कारण ती आपला पुढचा सगळा वेळ येणाऱ्या बाळासाठी देणार आहे.
दीपिका पदुकोण का ठरणार वेगळी आई
आपल्याला माहितच आहे बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांची मुलं ही त्यांच्या नॅनी सांभाळतात. पण दीपिकाने घेतलेला निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. दीपिकाने आपला पुढचा वेळ हा फक्त आपल्या बाळासाठी ठेवला आहे. त्यामुळे तिने मदतीसाठी नॅनी न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिला स्वतःला आपल्या बाळासोबतचा वेळ घालवायचा आहे.
Hand on Mommy म्हणजे काय?
रिपोर्टनुसार, दीपिकाने व्हाईट लोटसचा तिसरा सिझन टाळला आहे. दीपिका स्वतःला आपल्या बाळाला वेळ द्यायचा आहे. ती स्वतः आपल्या बाळाचा सांभाळ करणार आहे. इंग्रजीत या टर्मला 'Hands on Mommy' असं म्हटलं जातं. यामध्ये आई मुलाच्या संगोपनासाठी कोणत्याही नॅनीची मदत घेत नाही. आईचा सगळा वेळ हा बाळासाठी असतो. बाळाचं संगोपन करताना आई हा एकमेव आधार असतो.
आलिया भट्ट आणि करीना कपूर खान यांनी प्रसूतीनंतर पुन्हा कामाला सुरुवात केली. पण, दीपिकाने आधी सांगितले होते की, तिला लहान मुले खूप आवडतात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे.
यानुसार दीपिका आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी कोणत्याही नॅनीची निवड करणार नाही. त्यामुळे दीपिका आणि तिच्या बाळाचा हा अतिशय खास वेळ असेल यात शंका नाही.
दीपिका पदुकोणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दीपिका आणि रणवीरने यावर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाच्या येण्याची घोषणा केली होती. एवढंच नव्हे तर अभिनेत्री 'कल्की 2898 एडी' मध्ये दिसली होती. त्यानंतर ती ॲक्शन डायरेक्टर रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये तिचा पती रणवीर सिंह देखील इतर अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. यंदाच्या दिवाळीत हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.