बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आई झाली आहे. तिने रविवारी सकाळी मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या प्रेग्नेंसी शूटचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये रणबीर आणि दीपिका यांच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी सहज दिसत आहे. नेटिझन्स बॉलिवूडच्या या पॉवर कपलचे अभिनंदन करत आहेत. एवढंच नव्हे तर एक सुंदर नाव देखील सुचवत आहेत. ते नाव काय आहे आणि त्याचा अर्थ जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूरच्या चाहत्यांनी त्यांच्या मुलीसाठी 'आर' अक्षराने नाव सुचवले आहे. हे नाव 'रविका' आहे, जे दोन्ही नाव एकत्र करून तयार केले गेले आहे. हे नाव विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी 'वामिका' सारखे वाटते. 'का' हे अक्षर दीपिकाकडून आणि 'आर' आणि 'व्ही' अक्षरे रणवीरकडून घेण्यात आली आहेत. एका यूजरने दीपिका आणि रणबीरची नावे एकत्र करून 'राधिका' हे नाव सुचवले आहे तर दुसऱ्याने 'रुहानी' सुचवले आहे.


राधिका, रविका आणि रुहानी यांचा अर्थ काय?


राधिका या नावाचा अर्थ - कृष्णाची प्रिय, आनंदाने भरलेली, श्रीमंत, देवी राधा किंवा भगवान कृष्णाची प्रिय व्यक्ती असा त्याचा अर्थ आहे. 


रुहानी म्हणजे आध्यात्मिक, पवित्र आणि दैवी, असा या नावाचा अर्थ आहे.


रविकाचा अर्थ- सुरतसारखे तेजस्वी, सूर्यकिरण असा या नावाचा अर्थ आहे. 


दिशानी -  तिचे नाव दिशानी पदुकोण सिंग असावे, असं देखील एका युझरने सजेस्ट केलं आहे. एवढंच नव्हे तर दिशानी हे नाव अतिशय युनिक आहे. 


रुआंशी - रुआंशी नावाचा अर्थ परमेश्वराचा अंश. रु म्हणजे परमेश्वर किंवा अंर्तमनाशी जोडली गेलेली. 


शिवानी - शिवानी या नावाचा अर्थ आहे शिवाची वाणी. शिव शंकराचा विशेष आशिर्वाद या नावावर आहे.


रश्विका - रश्विका या नावाचा अर्थ आहे रेशमी; पुण्यवान; धार्मिक. दीपिका-रणवीर या नावांचा देखील विचार करु शकतात. 


रिध्वी - रिध्वी या नावाचा अर्थ आहे संपत्ती, भरभराट. दीपिका-रणवीर प्रमाणे तुम्ही देखील मुलींसाठी या नावांचा विचार करु शकता. 


रणविका - रणविका हे नान दीपिका आणि रणवीर यांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरावरुन घेण्यात आले आहे. 


 दिरा, विधात्री, राणिका, धीनवीरका या नावाचं सजेशन देखील दीपिका - रणवीरच्या मुलीच्या नावासाठी देण्यात आलं आहे,.