Dhanteras Shopping Time : दिवाळीचा सण पुढच्या आठवड्यापासून सुरु होतोय. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. दरवर्षी कार्तिक मासच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी म्हटलं जातं. या दिवशी धन प्राप्तीसाठी कुबेर देवता, धनवंतरी देवाची पूजा केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी खरेदी केलेली वस्तू लाभदायी असते. धनत्रयोदशीला सोने, वाहन, संपत्ती, घर, खरेदी करण्यासाठी हा शुभ मुहूर्त मानला जातो. 


धनत्रयोदशी तिथी 


धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. यावेळी त्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.31 वाजता सुरू होत आहे. हा शुभ मुहूर्त 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:15 वाजता संपेल. या कारणास्तव 29 ऑक्टोबर 2024 रोजी धनत्रयोदशीची पूजा होणार आहे.


धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी 3 शुभ वेळा 


धनत्रयोदशीच्या दिवशी घरे, भांडी, सोन्या-चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी करणार असाल तर -


शुभ मुहूर्त मंगळवार, 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.31 ते 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.32 पर्यंत असेल.
खरेदीची वेळ - 06.31 pm - 08.13 pm
तिसरी खरेदीची वेळ - 05.38 pm - 06.55 pm
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीच्या परंपरेमुळे दिवसभर खरेदी करता येते, परंतु जाणकारांच्या मते, धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळची वेळ लक्ष्मी आणि कुबेरची पूजा आणि यम दीपदानासह खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ असेल.


धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करा


धनत्रयोदशीच्या दिवशी फक्त सोने, चांदी, पितळ, फुले, पितळ किंवा तांब्यापासून बनवलेल्या वस्तू खरेदी कराव्यात. हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. धातूची भांडी अवश्य खरेदी करा, कारण या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रमंथनाच्या वेळी कलशात अमृत घेऊन आले होते, म्हणून या दिवशी धातूची भांडी खरेदी करा.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)