कांजीवरम साडीची विशेषता


कांचीपुरम ही साडी हाताने विणली जाते.  या साड्या मलबेरी सिल्कपासून तयार होतात, हा सिल्क अत्यंत उच्च दर्जाचा असतो. कांजीवरम साड्यांवर सोन्याची किंवा चांदीची जरी केलेली असते. या साड्या वाइब्रंट रंगांमध्ये येतात आणि त्यांच्या टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहेत. साडीवर केलेले हातकाम खूप सुंदर दिसते. या साड्या लग्नसमारंभ, सण-उत्सव अशा खास प्रसंगी नेसल्या जातात.


GI टॅग आणि कांजीवरम साडीची ओळख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कित्याक वेळा कांजीवरम आणि कांचीपुरम बनावटी किंवा नकली साड्या बाजारत विकल्या जातात. या साडीच्या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. अशात फसवणूक होण्याची शक्यता असते. म्हणून कांजीवरम साडीला भारत सरकारने 2005-2006 साली जियोग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग दिला आहे. त्यामुळे ही साडी खरी आहे की नाही, हे तपासणे सोपे झाले आहे.


कुठे आणि कशी तयार करतात?


जर तुम्ही तमिळनाडूला जाण्याचा विचार करत असाल, तर कांचीपुरम शहराला नक्की भेट द्या. येथील कांजीवरम साड्या उत्कृष्ट दर्जाच्या असतात. कांचीपुरमच्या प्रत्येक गावातील घराघरामध्ये ही साडी तयार करणारे कारागीर असतात.कांजीवरम साड्या त्यांच्या गुणवत्तेमुळे आणि सुंदरतेमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जरी त्या महाग असल्या, तरीही त्या साडींची डिझाईन आणि टिकाऊपणा किमतीपेक्षा खूप मौल्यवान आहेत.


हे ही वाचा: मेकअप करताना इतरांसोबत शेअर करताय लिपस्टीक, पावडर? आत्ताच थांबा नाहीतर...


कांजीवरम आणि कांचीपुरम साडीत फरक काय?


कांजीवरम आणि कांचीपुरम या एकाच साडीची दोन वेगवेगळी नावे आहेत. कारण कांजीवरम साडी तमिळनाडूमधील कांचीपुरम या छोट्या शहरात पारंपारिक सिल्कपासून तयार केली जाते. त्यामुळे तिचे अधिकृत नाव कांचीपुरम साडी आहे. पण देशभरात ती कांजीवरम साडी म्हणून प्रसिद्ध आहे.


तर, आता तुम्ही कांजीवरम आणि कांचीपुरम साडी यांच्यातील गोंधळ दूर करू शकता आणि योग्य साडीची निवड करू शकता!