Idols Cleaning Before Diwali: दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. दिवाळीच्या आधी घराघरात साफसफाई केली जाते. घरातील फर्निचर, फरशी, जळमटे अशी स्वच्छता मोहिम सर्वांच्याच घरात सुरू होते. दिवाळीच्या आधी तांबा-पितळेची भांडी स्वच्छ करणे ही मोठी डोकेदुखी असते. कारण सतत वापरुन वापरुन तांब्या पितळेची भांडी किंवा देवांच्या मूर्त्या काळ्या पडतात. अशावेळी मूर्त्यांवर साचलेली चिकट धूळ व थर साफ करणे खूप कठिण होऊन जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तांब्या-पितळेची भांडी किंवा मूर्ती स्वच्छ करण्यासाठी व नव्यासारखी चमकवण्यासाठी काही सोप्पे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळं दिवाळीच्या आधी तांबा आणि पितळेच्या मूर्ती लख्ख चमकतील. 


लिंबू आणि मीठाचा वापर 


लिंबू आणि मीठाचा वापर धातुच्या वस्तु साफ करण्यासाठी पारंपारिक उपाय आहे. एक लिंबू कापून त्यावर थोडेसे मीठ टाका. आता या लिंबाच्या फोडीने तांबा आणि पितळेच्या मूर्तीवर घासून काढा. लिंबात असलेले अॅसिडी धातुंवर साचलेला मळ हटवण्यास मगत करते. तर मीठ स्क्रबरप्रमाणे काम करते. यानंतर मूर्ती कोमट पाण्याने साफ करुन एका कपड्याने पुसून घ्या. 


व्हिनेगर आणि बेकिंग सोडा


व्हिनेगर आणि बेकिंग सोडा याचे मिश्रण तांबे आणि पितळेच्या मूर्ती साफ करा. एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा आणि त्यात थोडं व्हिनेगर टाका. आता हे मिश्रण मूर्तीला लावून हातांनी स्क्रब करा. यामुळं मूर्तीवर साचलेला मैला स्वच्छ होईल आणि चमक येईल. 


टोमॅटोचा रस 


टोमॅटोचा रसदेखील एक क्लिनिंग एजंट म्हणून काम करते.  टोमॅटोचा रस तांबा, पितळेच्या मूर्तीवर लावा आणि काहीवेळ तसंच ठेवून द्या. त्यानंतर साधा कपड्याने मूर्ती साफ करा आणि पाण्याने धुवून घ्या. 


बेसन आणि हळद 


बेसन आणि हळद याचे मिश्रण तांबे आणि पितळेच्या मूर्तीवर लावा हा एक चांगला पर्याय आहे. याची पेस्ट बनवून मूर्तीला लावून घ्या काही वेळ सुकल्यानंतर स्क्रबकरुन पाण्याने धुवून घ्या. मूर्ती एकदम स्वच्छ होतील. 


कोल्डड्रिंकचा वापर


कोल्डड्रिंकमध्येही तांबा, पितळेची भांडी घासून स्वच्छ होतात. मूर्ती थोड्यावेळासाठी कोल्डड्रिंकमध्ये ठेवून द्या आणि साफ कपड्याने धुवून घ्या. यामुळं मूर्ती स्वच्छ होतात.