Cleaning With Salt: आपल्या जेवणात मिठाचे फार महत्त्व आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की मीठाचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी होतो, तर हा गैरसमज दूर करायला हवा. आपण मिठाचा वापर साफसफाईसाठी देखील करू शकतो. होय, तुम्ही ठीक वाचलं. एक चमचा मीठ तुमच्या घरातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतील घाण काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकते. मिठाचा कसा वापर करायचा हे जाणून घेऊयात... 


किचनमधल्या टाईल्स होतील साफ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किचनमधल्या टाईल्सवर तेल आणि मसाल्यांमुळे डाग पडतात. अनेक जण लोक त्यांना स्वच्छ करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात परंतु थोडे डाग तरी टाइल्सवर राहतात. कोमट पाण्यात मीठ आणि बेकिंग सोडा मिसळा.आता या पाण्यात डस्टर भिजवा आणि टाईल्सवरचे डाग पुसा.


बाथरूम होईल स्वच्छ 


बाथरूमधले साबण, गाजलेल्या बादल्या, मग यामुळे डाग पडतात. हे डाग साफ करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. चांगले परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही पाण्यात बेकिंग सोडा देखील टाकू शकता. आता या मिश्रणात स्क्रब बुडवा आणि बादली आणि मग साफ करण्यास सुरुवात करा. काही मिनिटांतच तुम्हाला आपोआप चांगले रिझल्ट्स मिळतील.  


तांब्याची भांडी


तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी मीठ वापरता येते. मीठ काळी झालेली तांब्याची भांडी पूर्णपणे स्वच्छ करू शकते. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी आधी  लिंबू अर्धा कापून घ्या.आता या कापलेल्या लिंबावर एक चमचा मीठ लावा आणि नंतर या खारवलेल्या लिंबाने भांडी घासून स्वच्छ करा.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)