निरोगी राहण्यासाठी योग्य आहार घेणं फार महत्त्वाच आहे. योग्य आहार आणि योग्य वेळी घेतल्याने आपल्या शरीराला फायदा होतो. भारतीय घरांमध्ये वरण भात आणि भाजी पोळी असं जेवणाच ताट असतं. खास करुन दुपार जेवणात भाजी पोळी खाल्ल्यानंतर वरण भाताने समाधान मिळतं. बहुतेक लोकांना भात खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटत नाही. अशा संपूर्ण जेवणामुळे आपल्या शरीराला पोषक द्रव्ये मिळतात. पण चपाती आणि भात एकत्र खाणे योग्य आहे की नाही? असा प्रश्न अनेकांच्या मनात पडतो. जाणून घेऊयात आहार तज्ज्ञ मात्र यावर काय सांगतात. (Do you also eat rice and chapati together Experts say very dangerous for health)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाच उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही डायट टू नुरिशच्या सह-संस्थापक प्रियांका जैस्वाल यांच्याशी संवाद साधला. त्या सांगता की,  10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सकस आहार घ्यायला हवा. प्रियांका यांनी मानव रचना इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, फरीदाबादमधून  फूड अँड न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलीय. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्येही काम केलं. त्यांनी मॅक्स हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल आणि एम्स यांसारख्या हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण घेतलंय. प्रियांका म्हणतात की, पोळीत आणि भातात वेगवेगळे पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे त्यांचे एकाच वेळी सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नसतं. 


भात, चपाती एकत्र खाल्ल्यास काय होतं?


प्रियांका म्हणतात की, चपाती आणि भात एकत्र खाल्ल्यास आपल्या अनेक आजारांचा सामना करावा लागतो. भात आणि चपाती एकत्र खाल्ल्यास साखरेची पातळी झपाट्याने वाढण्याची भीती असते. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते. याशिवाय या दोन गोष्टी एकत्र खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप धोकादायक मानल्या जातात. कारण त्यामुळे त्यांची साखरेची पातळी असंतुलित होते. 


आहारतज्ज्ञ प्रियांकाच्या मते, चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने आतड्यांमध्ये किण्वन होते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील खूप जास्त परिणाम होतो. ज्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होतात. 


चपाती आणि भात दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीरात स्टार्च शोषून घेतलं जातं. यामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. शिवाय सूज येण्याच्या समस्येलाही होते. त्यामुळे चरबी वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. 


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)