Nita Ambani : सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नीता अंबानींचा हटके लूक, `या` साडीचं वेगळेपण माहितीये?
नीता अंबानी यांची प्रत्येक गोष्ट खास आहे. मग ते त्यांचं काम असो किंवा लूक. वयाच्या साठीमध्येही नीता अंबानी यांच्या लूकची चर्चा होते. सामुहिक विवाह सोहळ्याला नीता अंबानी यांची लाल रंगाची बनारसी साडी खास होती, या साडीचं वेगळेपण जाणून घ्या.
Nita Ambani : अंबानी कुटुंबातील शेवटचं लग्न पार पडणार आहे. नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या तिसऱ्या मुलाच्या म्हणजे अनंत अंबानीच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये नीता अंबानी यांचा लूक चर्चेत असतो. कधी त्या शॉपिंगसाठी वाराणसीमध्ये साडीच्या लूकमध्ये दिसतात तर कधी वेस्टर्न कपड्यात.
नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या लग्नाअगोदर 50 जोडप्यांचे सामुहिक विवाह सोहळा संपन्न केला. यामध्ये नीता अंबानी यांच्याच लूकची चर्चा झाली. लाल रंगाची बनारसी साडी आणि त्यावरचं बारीक काम हे अतिशय लक्षवेधी ठरलं. एवढंच नव्हे तर त्यावरचे दागिने आणि खास करुन कानातल्यांची विशेष चर्चा झाली.
सामुहिक विवाह सोहळ्याच चर्चा नीता अंबानींची
अंबानी कुटुंबियांनी रिलायन्स कार्पोरेट पार्कमध्ये सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते. ज्यामध्ये नीता-मुकेश अंबानी, ईशा अंबानी पतीसह आणि आकाश अंबानी पत्नीसह उपस्थित होते. 800 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात चर्चा मात्र नीता अंबानी यांचीच होती. जाणून घेऊया साडीचं वेगळेपण.
रेशमी साडी आणि नीता अंबानी
नीता अंबानी यांनी खास सोहळ्याला लाल रेशमी रंगाची साडी नेसली होती. ज्या साडीच्या बॉर्डरवर सोनेरी धाग्यांनी चिमणी तयार करुन युनिक डिझाइन तयार केली आहे. तसेच पातळ हलक्या पाइपिनने याची फिनिशिंग करण्यात आली आहे.
साडीवर गायत्री मंत्र
नीता अंबानी यांच्या साडीवर गायत्री मंत्र लिहिला आहे. साडीवर कैरीची डिझाइन आहे. साडीचा हा खास लूक अतिशय युनिक आहे. नीता अंबानी यांच्या पदरावर गायत्री मंत्र लिहिलेला आहे. या हेवी पदरावर गायत्री मंत्र लिहिलेला आहे. एवढंच नव्हे तर नीता अंबानी यांनी भगवान कृष्णाची पोटली देखील कॅरी केली आहे.
कानातल्यांवर बाप्पा
नीता अंबानी यांनी आपल्या साडीसोबतच मेकअप आणि ज्वेलरीला खास बनवलं आहे. या साडीवर नीता अंबानी यांनी गुट्टापुसालू नेकलेससोबत गणपती बाप्पाचे स्टेटमेंट ईअररिंग्स कॅरी केले आहेत. ब्राऊन, आयशॅडो , काजल, मस्करा, ब्लश्ड चीक्स याने आपला लूक परफेक्ट बनवला आहे.