How To Identify Red And Sweet Watermelon: उन्हाळ्यात कलिंगडाची मागणी जास्त वाढते. शरीरात थंडावा निर्माण करणारे हे फळ आहे. कलिंगड खाल्ल्याने शरीरातील उष्णता शमते तसंच, आरोग्यासाठीही कलिंगड खूप फायदेशीर आहे. लाल भडक कलिंगड म्हणजे गोड असणारच हे पाहूनच कलिंगड आपण खरेदी करतो. बाजारातून कलिंगड आणताना ते लाल आहे का हे तपासून घेतो. मात्र, लाल भडक दिसणारे कलिंगड हे बनावट किंवा नकली असू शकते. अशा कलिंगडांमध्ये हानिकारक घटक असू शकतात. ते आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. असे कलिंगड कसे ओळखावेत याबद्दल जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा लाल भडक कलिंगड म्हणजे ते गोड असेलच असा समज करुन ते खरेदी केले जाते. मात्र अशा कलिंगडांना लाल दिसण्यासाठी कृत्रिमरित्या पिकवलं जातं तसंच, इंजेक्शनदेखील दिले जाते. जेणेकरुन ते लाल दिसावं मात्र चवीला ते गोड नसतंच. पण यामुळं अनेक आजारदेखील होऊ शकतात. FSSAIने दिलेल्या माहितीनुसार कलिंगडाच्या आत इंजेक्शनच्या माध्यमातून एरिथ्रोसिन केमिकल वापरले जाते. हे एक प्रकारची लाल शाही असते जी मिठाई, कँडी, ड्रिंक्ससारख्या पदार्थांमध्ये वापरले जाते. सरकारने फळांमध्ये ही खतरनाम डाय वापरण्यास बंदी घातली आहे. 


गोड टरबूज कसे ओळखाल?


FSSAI ने दिलेल्या माहितीनुसार, कलिंगड दोन हिश्श्यात कापून घ्या. त्यानंतर दोघांपैकी एका हिस्सा घ्या. त्यानंतर कापसाचा एक छोटा बॉल बनवून तो कलिंगडाच्या एका भागावर रगडा. जर त्या कापसाला लाल रंग लागला नाही तर तुम्ही घेतलेले कलिंगड पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे. हे फळ पिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही. त्यामुळं हे फळ गोड असणारच. 


तसंच, जर कलिंगडावर कापूस रगडल्यावर रंग लाल झाला तर ते फळ पिकवण्यासाठी केमिकलचा वापर केला गेला आहे. हे तुमच्या खाण्यासाठी योग्य नाहीये ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. पोटात एरिथ्रोसिन केमिकल गेल्याने उलटी, पोट दुखी, बद्कोष्ठता, मळमळणे, भूख न लागणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.काही संशोधनानुसार, थायरॉइडच्या समस्या निर्माण होऊ शकतात. 


टरबूज खाण्याचे फायदे?


टरबूज खाल्ल्याने उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव होतो.तसंच, टरबूज खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहते. त्याचबरोबर कॅन्सरचा धोका कमी होतो. यात लाइकोपीनसह अनेक व्हिटॅमिन व मिनरल्स असतात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.