High Uric Acid Control Tips: कोलेस्ट्रॉलनंतर अजून गंभीर समस्या आहे ती म्हणजे युरिक अ‍ॅसिडची. शरिरात युरिक अ‍ॅसिड वाढल्यास संधिवात होतो. यूरिक अ‍ॅसिड हे शरीरात तयार होणारे विष असून ते किडनी फिल्टर करतं आणि लघवीद्वारे सहजपणे बाहेर पडतं. युरिक अ‍ॅसिड तयार होणं ही समस्या नसून युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर पडणे हे महत्त्वाच आहे. प्युरीन आहाराच्या अतिसेवनामुळे रक्तामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढते आणि क्रिस्टल्सचं प्रमाण वाढतं. हे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये जमा होतं आणि त्यामुळे आपल्याला तीव्र वेदना होतात. एवढंच नाही तर या क्रिस्टल्समुळे उठणे-बसणेही रुग्णांना कठीण होऊन बसतं. याच्या बोटात, पायाच्या तळव्यामध्ये आणि वासरांमध्ये ही वेदना अधिक तीव्र होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्सचे माजी सल्लागार आणि शौल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. बिमल झाजर हे सांगतात की, ज्या लोकांना यूरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असतं त्यांनी आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करायला पाहिजे. आहार तज्ज्ञांनुसार काही पदार्थांच्या सेवनामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 


हेसुद्धा वाचा - जास्त पाणी प्यायल्याने Bad Cholesterol नियंत्रणात राहतं का? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...


'या' भाज्यांचं सेवन करा!


ज्या लोकांना यूरिक अ‍ॅसिड जास्त आहे त्यांनी आहारात हिरव्या पालेभाज्या, भोपळा आणि ब्रोकोलीचं सेवन करावं. या भाज्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. शिवाय स्प्राउट्स आणि सिमला मिरची सारख्या व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या काही भाज्यांचे सेवन केल्याने यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. 


'या' फळांचं सेवन करा!


व्हिटॅमिन सी युक्त चेरी आणि किवीचे सेवन केल्याने यूरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास फायदेशीर ठरते. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फोलेट असतात जे शरीरात जमा झालेल्या यूरिक ॲसिडची पातळी काढून टाकते. 


'हे' पेय प्या!


ज्या लोकांमध्ये यूरिक ॲसिडचे प्रमाण जास्त असतं त्यांनी आहारात लिंबू पाणी, ऍपल सायडर व्हिनेगर, चेरी ज्यूस, टरबूज आणि काकडीचा रस यांचे सेवन करावं. हे रस रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि यूरिक ॲसिडची पातळी देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. 


कलौंजीच्या बियांचं सेवन


ज्या लोकांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी कलौंजी बियांचे सेवन करावे. जे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून एका ग्लास पाण्यात एक चमचा कलौंजी बिया टाका आणि चांगले उकळा. हे पाणी गाळून सेवन करा, 10 दिवसात यूरिक ॲसिड नियंत्रणात येण्यास मदत मिळते. 


'या' बियांचे सेवन करा


ज्या लोकांना यूरिक ॲसिड जास्त आहे त्या लोकांनी आहारात फ्लेक्स बिया आणि चिया बियांचे सेवन करावे. ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि फायबरने समृद्ध असलेले या बिया सांधेदुखीवर फायदेगार आहे. चिया बियांचे सेवन शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं आणि सांध्यांमध्ये जमा झालेले क्रिस्टल्स मोडतं. जर तुम्हालाही यूरिक ॲसिड नियंत्रित करायचं असेल तर या बियांचं रोज सेवन करणे फायदेशीर ठरते.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)