पिवळी उशी किंवा उशीचे कव्हर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा! ठरु शकतात फारच धोकादायक
Never Use Yellow Pillow Know The Reason: पिवळ्या रंगाची उशी वापरणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. एका त्वचारोग तज्ज्ञाने यासंदर्भात सोशल मीडियावरुन इशारा दिला आहे.
Never Use Yellow Pillow Know The Reason: पिवळा रंग सामान्यपणे अनेकांना आवडतो. मात्र तुम्ही पिवळ्या रंगाच्या उशी वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. पिवळ्या रंगाची उशी वापरणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. एका त्वचारोग तज्ज्ञाने यासंदर्भात सोशल मीडियावरुन इशारा दिला आहे. पिवळी उशी वापरणं का बंद करायला हवं यासंदर्भातील व्हिडीओ या तज्ज्ञाने पोस्ट केला आहे. या व्यक्तीने अशा गोष्टी सांगितल्या आहेत की त्यासंदर्भात जाणून घेतल्यानंतर तुम्हीही पिवळी उशी वापरणं बंद कराल.
ते डाग धोकादायक
मिसिसिपीमध्ये राहणारी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. लिंडसे ज़ुब्रित्स्की यांनी टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज़ुब्रित्स्की या अनेकदा त्वचेसंदर्भातील सल्ले आणि माहिती आपल्या हॅण्डलवरुन शेअर करत असतात. अस्वच्छ उशीवर झोपल्याने आरोग्यासाठी काय धोका पोहचू शकतो याबद्दल ज़ुब्रित्स्कीने माहिती दिली आहे. तसेच या धोक्यापासून आपण मुक्ती मिळवणं का महत्त्वाचं आहे यावरही ज़ुब्रित्स्की यांनी प्रकाश टाकला आहे. या व्हिडीओमध्ये एक डाग लागलेली मळकट चादर दाखवत ज़ुब्रित्स्कीने, जर तुम्ही अशा घाणेरड्या, जुन्या, पिवळे डाग पडलेल्या उशींचा वापर करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
हे डाग पडतात कसे?
ज़ुब्रित्स्कीने चादर आणि उशीवरील पिवळ्या रंगाचे डाग दाखवत हे डाग घाण आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे पडल्याचं सांगितलं. या डागांच्या माध्यमातून होणाऱ्या संसर्गामुळे त्वचेसंदर्भातील रोग होतात. सातत्याने झोप मोड होणे, श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्याही यामुळे उद्भवू शकतात. हे पिवळे डाग नेमके येतात कुठून असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर याबद्दलची माहिती जाणून तुम्हाला फारच घ्रृणा वाटेल. ज़ुब्रित्स्की यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोपेत अनेकांच्या तोंडातून लाळ गळते. काहीजण केस ओले असतानाच झोपतात. त्वचेतून निघणारं तेल, मेकअप आणि डेड सेल्सच्या एकत्रित परिणामामधून हे पिवळे डाग बिछान्यावर पडतात. त्यामुळेच तुमची उशी किंवा उशीचा कव्हरच पिवळ्या रंगाचा असेल तर हे डाग सहज दिसून येत नाहीत. या डागांमधील घाण त्वचेवरील छिद्रांमध्ये अडकल्याने ही छिद्रं बंद होतात. त्यामुळे बोंड येणं किंवा पिम्पल्सची समस्या भेडसावते.
अनेकांनी व्यक्त केली चिंता
त्वचारोग तज्ज्ञ असलेल्या ज़ुब्रित्स्कीने दिलेल्या माहितीनुसार तर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर बिछान्यावरील या डागामुळे सूज येणे, एक्झिमा, रोसैसियासारख्या समस्या निर्माण होतात. पिवळ्या उशांमुळे विषाणूंचा समावेश असलेले हे डाग जंतूंसाठी 'प्रजनन स्थळांसारखं' काम करतात. हे छोटे जिवाणू आपल्या शरीरावरील मृत पेशी खातात. या विषाणूंबरोबरच त्यांच्यामधून उत्सर्जित होणारे पदार्थ श्वासांवाटे शरीरामध्ये घेता. सामान्यपणे पिवळ्या डागांमुळे सकाळी उठल्या उठल्या शिंका येतात. उशी जुनी झाल्यानंतर ती आधीप्रमाणे मानेला सपोर्ट देत नाही. त्यामुळे वेळोवेळी उशी बदलणं गरजेचं अशतं. ज़ुब्रित्स्की यांनी सांगितलेल्या माहितीनंतर अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करुन चिंता व्यक्त केली आहे. एकाने आपण यापुढे कधीच पिवळी उशी वापरणार नाही असं म्हटलं आहे. अन्य एकाने 4 महिन्यातून उशी धुतली पाहिजे किंवा ठराविक काळाने बदलली पाहिजे असं म्हटलं आहे.