गुढीपाडव्याच्या दिवशी मराठमोळी संस्कृती जपणारी अद्वितीय, पारंपरिक मुलांची नावे
Gudi Padwa 2024 : आज गुढीपाडवा.. हिंदू नववर्ष दिन. आजच्या दिवशी घरी बाळाचा जन्म झाला असेल तर ठेवा ही खास पारंपरिक, मराठमोळी नावे.
हिंदू नववर्ष दिन हा गुढीपाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो.या दिवशी दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या मंगलदिनी जर घरी गोंडस पाऊले आली तर त्यांच्यासाठी देखील निवडा अशीच खास नावे.
मुलींसाठी नावे-अर्थ
सावित्री - देवी सरस्वती, एक नदी, शुद्ध असा या नावाचा अर्थ.
यमा - प्रवाह", "गती", "रात्र", "मृत्यूचा देव, नदी असा या नावाचा अर्थ आहे.
कामायनी - इच्छा, प्रेमाचा आरसा असा कामायनी नावाचा अर्थ आहे.
रोमाला - मोहक, केसाळ असा या नावाचा अर्थ आहे.
माद्री - पांडूच्या पत्नीचे नाव देखील मोहक होते. मुलीवर पडेल सकारात्मक बदल.
द्रोपदी - पांडवांची पत्नी, अग्नीची मुलगी असा देखील त्याचा द्रोपदी.
देवकी - श्रीकृष्णाची आई असा या नावाचा अर्थ आहे. देवकी म्हणजे प्रेमळ.
यशोदा - श्रीकृष्णाची आई असाच यशोदा या नावाचा अर्थ आहे.
सिता - रामाची पत्नी असा सिता या नावाचा अर्थ आहे.
(हे पण वाचा - Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या दिवशी बेबी शूटचा विचार करताय, 9 पद्धती करा फॉलो)
मुलांची नावे-अर्थ
सृजन - सृजन हे देखील अतिशय वेगळं नाव आहे. या नावाचा अर्थ आहे रचनाकार. हे नाव अतिशय वेगळं आहे. हिंदू मुलाचं नाव अतिशय सुंदर आहे.
स्वस्तिक - स्वस्तिक नावाचा अर्थ 'शुभ' असा आहे. स्वस्तिक हे हिंदू/भारतीय वंशाचे नाव आहे आणि हे नाव मुलासाठी वापरले जाते.
स्पंदन - भारतीय मूळ नाव स्पंदन, म्हणजे हृदयाच्या ठोक्याचा आवाज. स्पंदन हे नाव भारतीय वंशाचे असून मुलाचे नाव आहे. स्पंदन नावाचे लोक सहसा धर्माने हिंदू असतात.
सिया - सिया या नावाचा अर्थ आहे देवी सीता, पांढरा चांदणे, एक देखणी स्त्री, पांढरा दारवा गवत, अरबी चमेली, मिठाई साखर.
सृजा - सृजा हे हिंदू मुलीचे नाव आहे आणि सृजा नावाचा अर्थ तयार होतो.
त्रिजल - भगवान शिववरुन हे मुलाचे नाव ठेवू शकता.
त्रिपुरेश - या नावाचा अर्थ देखील शिव असा आहे.
अमरेश -इंद्रदेवाच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे
आरव - तेज आवाज, उत्तम आवाजाची मुले असा या नावाचा अर्थ आहे.रामायणामध्ये हा शब्द वापरला आहे.
मुलींची नावे
शबरी
गांधारी
कुंती
दुर्गा
विजयलक्ष्मी
देवकी
कौशल्या
सरोजिनी निवेदिता
सुजेता