Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या दिवशी बेबी शूटचा विचार करताय, 9 पद्धती करा फॉलो

Gudi Padwa Baby Photoshoot : गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. अनेक पालक या दिवशी लहान मुलांचे फोटोशूट प्लान करतात. अशावेळी 8 पद्धती योग्य पद्धतीने फॉलो केल्यास फोटो येतील अधिक सुंदर. 

| Apr 08, 2024, 17:22 PM IST

गुढीपाडवा या सणाची लगबग सगळीकडेच पाहायला मिळत आहे. या दिवशी गुढी उभारून नवं वर्षाचं स्वागत केलं जातं. हिंदू संस्कृतीत गुढी पाडव्याला अधिक महत्त्व आहे. अशावेळी आपल्या मुलांमध्ये देखील या संस्कृतीची आवड निर्माण व्हावी म्हणून खास बेबी शूट गुढीपाडवा या थिममध्ये केलं जातं. अशावेळी कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत ते समजून घ्या. 

1/9

पारंपारिक वेशभूषा

Gudi Padwa 2024

गुढीपाडवा हा हिंदू नववर्ष दिन आहे. या दिवशी मुलांना पारंपरिक वेशभूषा करुन फोटोशूट करा. यामध्ये मुलींना साजेशी अशी नऊवारी साडी नेसवा आणि पारंपरिक दागिने घाला. तसेच जर मुलांचं फोटोशूट करत असाल तर त्यांना छोन कुर्ता, धोतर आणि मराठमोळा फेटा घाला. लक्षात ठेवा ही तान्हुली आणि नाजूक मुलं असतील अशावेळी त्यांच्यासाठी सॉफ्ट आणि नाजूक फॅब्रिक निवडा. 

2/9

फुलांच्या ज्वेलरी

Gudi Padwa 2024

मुलांच गुढीपाडव्याला फोटोशूट करताना सजावटीसाठी आणि ज्वेलरी म्हणून फुलांचा समावेश करु शकता. यामध्ये तुम्ही मुलीसाठी छान गळ्यातील माळ किंवा टिआरा तयार करु शकता. तसेच मुलांना देखील फुलांचा वापर करु शकता. हे फोटोशूटमध्ये तुम्ही फुलांचा सर्रास वापर करा. 

3/9

डेकोरेशन

Gudi Padwa 2024

बेबी फोटोशूट करत असताना डेकोरेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. अशावेळी तुम्ही गुढीपाडव्या दिवशी वापरणारे बत्ताशे, कडुलिंबांची पाने, पुरी-श्रीखंड, गुढीची छोटी प्रतिमा या सगळ्याचा वापर करुन डेकोरेशन करु शकता. 

4/9

गुढी

Gudi Padwa 2024

मुलं थोडी मोठी असतील तर गुढी उभारताना मुलांचे फोटोशूट करु शकता. यामुळे मुलांना गुढी कशी उभारतात याची देखील माहिती देऊ शकता. गुढी उभारताना वेळूची काठी, कडुलिंबाचा पानं, आंब्याची पानं, तांब्याचे कलश, काठापदराची साडी, ब्लाऊज पीस, साखरेचा हार, फुलांचा हार यांचा समावेश करु शकता.   

5/9

गोड पदार्थ

Gudi Padwa 2024

गुढी पाडवा म्हणजे गोड पदार्थांची रेलचेल. पुरी आणि श्रीखंड, पुरी किंवा आमरस अशी थिम बनवून लहान मुलांचं फोटोशूट करु शकता. तसेच उन्हाळ्यातील मिळणाऱ्या आंब्याचा देखील तुम्ही समावेश करु शकता. 

6/9

फॅमिली बॉन्डिंग

Gudi Padwa 2024

फोटोशूट लहान मुलांचं असलं तरीही पालकांनी किंवा घरातील इतर मंडळींनी देखील छान नटावं आणि फोटोशूट करावं. तसेच यामुळे लहान मुलांसोबत फॅमिली बॉन्ड तयार करु शकता. त्यामुळे हे फोटोशूट लहान मुलांचं नसून संपूर्ण कुटुंबाचं असणार आहे. 

7/9

क्रिएट थिम फोटोशूट

Gudi Padwa 2024

फोटोशूटला एक थिम फॉलो करा. गुढीपाडव्यासोबतच पारंपरिक पद्धतीने फोटोशूट करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमची थिम ही पारंपरिक असणे गरजेचे आहे. ही थिम गडद रंगाची असावी कारण कॅमेऱ्यात हे रंग छान दिसतील. 

8/9

आऊट डोअर फोटोशूट

Gudi Padwa 2024

इनडोअरसोबतच आऊट डोअर फोटोशूट देखील छान दिसेल. कारण गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या सुरुवातीला येणार सण आहे. यावेळी वातावरणात बदल होत असतात. म्हणून आऊट डोअर फोटोशूट छान होते. मोकळ्या जागी फोटोशूट करावे. 

9/9

कॅन्डिड फोटोशूट

Gudi Padwa 2024

गुढी पाडव्याच्या फोटोशूटमध्ये तुम्ही मुलांचे कॅन्डिड फोटोशूट देखील करु शकता. मुलांचे या क्षणाच्यावेळी असणारे एक्सप्रेशन देखील खास असतील. त्यामुळे ते क्षण कॅन्डिड फोटोशूटमध्ये कॅप्चर करणे महत्त्वाचे ठरेल.