हिंदू पंचागानुसार, आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरुंना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. गुरुच्या कृपेने ईश्वराचे साक्षात्कार होते. गुरु पौर्णिमा हा दिवस गुरु आणि शिष्याच्या पवित्र नात्याचं प्रतिक आहे. यादिवशी शिष्याने गुरुप्रति कृतज्ञता व्यक्त करावी. जर या दिवशी तुमच्या घरी बाळाचा जन्म झाला तर त्याला द्या खास नावे. यानावावरुन कायम राहिल परमेश्वराचं स्मरण. 


दिक्षांत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिक्षांत या नावाचा अर्थ खास आहे. 'गुरुकडून खास मिळालेलं गिफ्ट' असा या नावाचा अर्थ आहे. 


गुरामर 


गुरामर हे नाव 'गुरु'या नावावरुन घेण्यात आलं आहे. मुलासाठी या नावाचा विचार करायला काहीच हरकत नाही. 


गुराम्रित 


गुरु या नावाचा सुंदर अर्थ असा या नावाचा अर्थ आहे. गुराम्रित हे नाव अतिशय युनिक आहे. तुम्ही मुलासाठी या नावाचा विचार करु शकता. 


निवन 


निवन या नावाचा अर्थ देखील गुरु, गुरुशी संबंधित असा आहे. त्यामुळे या नावाचा नक्की विचार करा. 


अनमय 


अनयम हे नाव अतिशय युनिक आहे. परमेश्वरावर अढळ विश्वास असा या नावाचा अर्थ आहे. पालकांनी या नावाचा नक्की विचार करा. 


श्लोक 


हिंदू धर्मात श्लोकाला अतिशय महत्त्व आहे. श्लोक या नावाचा विचार करा मुलासाठी. हे नाव नक्की निवडा. 


कैरव 


कैरव या नावाचा अर्थ आहे कमळाचे फूल. गुरुच्या या खास नावाचा नक्की विचार करा. 


अनमय 


अनमय हे नाव देखील अतिशय युनिक आहे. दृढ विश्वास असा या नावाचा अर्थ आहे. पालकांनी गुरुवरचा दृढ विश्वास म्हणून या नावाचा नक्की विचार करावा. 


अवयान 


अवयान हे नाव गणेशाच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे. अवयान या नावाचा विचार मुलासाठी करु शकता. कारण गणेशाचं हे नाव तुम्ही मुलासाठी ठेवू शकता. 


ईशिन 


ईशिन हे नाव पण युनिक आहे. मुलासाठी या नावाचा विचार करा. धैर्यवान अर्थ असलेल्या या नावाचा मुलाच्या जीवनावर खूप परिणाम पडेल. 


दैशिन 


दैशिन नावाचा अर्थ आहे अतिशय इमानदार. गुरुसाठी आपला भाव असा असणे गरजेचे आहे. त्यामुळे या नावाचा नक्की विचार करा. 


गुरु 


गुरु हे दोन अक्षरी नाव मुलासाठी नक्की निवडा. गुरु या नावातच परमेश्वराचं आणि ईश्वराचं स्मरण आहे. 


देवगुरु 


देवगुरु हे चार अक्षरी नाव असलं तरीही मुलासाठी हे नाव निवडा. कारण यामध्ये देव आणि गुरु या दोन शब्दांचा उल्लेख आहे. या दोन्ही नावांमध्ये परमेश्वराचे स्मरण आहे.