पनीर भारतातील लोकप्रिय डेरी उत्पादन मानले जाते. यातून मोठ्या प्रमाणात प्रथिने (प्रोटीन) मिळतात. पनीर हे नासलेल्या (फाटलेल्या) दुधापासून किंवा दह्यापासून तयार केले जाते. पनीर हे फक्त चविष्टच नाही तर आपल्या आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया कोणते आहेत हे फायदे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्नायू तयार होतात- 
कच्चे पनीर प्रथिनांचे स्त्रोत असल्याने, त्यातून भरपूर प्रथिने (प्रोटीन) मिळतात. हे प्रथिने स्नायू तयार करण्यात आणि स्नायूंची दुरुस्ती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.


वजन कमी करण्यासाठी उपयुक्त- 
कच्च्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने, कच्चे पनीर खाल्ल्यास तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे तुम्ही कमी खातात आणि याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.


ऊर्जेची पातळी वाढते-
कच्च्या पनीर पासून मिळणारे प्रथिने शरीराला ऊर्जा देतात आणि शरीरातील थकवा कमी करतात. 


मजबुत हाडं आणि दात-
कच्च्या पनीरमधून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी मदत होते. 


त्वचा सुधारते- 
कच्च्या पनीरमध्ये व्हिटॅमिन ए आणि ई असते. ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.


केस मजबूत बनतात-
प्रथिने आणि इतरही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेले कच्चे पनीर केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी मदत करते.


हृदयाचे आरोग्य सुधारते- 
कच्च्या पनीरमुळे हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.


तणाव कमी होतो-
पनीरमध्ये असलेले ट्रिप्टोफॅन तणाव कमी करण्यास मदत करते.


गरोदरपणातही फायदेशीर- 
कच्चे पनीर गर्भवती महिलांसाठी प्रथिन्यांचा (प्रोटीनचा) चांगला स्रोत आहे.