Deepika Padukone Diet Plan in Marathi : बॉलिवूड कलाकार नेहमी त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पादुकोन यात मागे नाही. दिपिका तिच्या आरोग्य आणि फीटनेस याकडे विशेष लक्ष देताना दिसते.  दीपिका पदुकोण आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2008 मध्ये तिने ओम शांती ओम या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली. दीपिका पदुकोण गेल्या 16 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे.  फिटनेसच्या बाबतीत ती आजही पूर्वीसारखीच फिट दिसते. तुम्हाला ही दिपिका पादुकोनसारखं फीट दिसायचं आहे का? मग जाणून घेऊया तिचा डाइट प्लॅन...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका पदुकोणनं नेहमी तिच्या मुलाखतींमध्ये फिटनेस रुटीन आणि डाएट प्लॅनबद्दल सांगत असते. ती अधूनमधून चॉकलेट ब्रेड किंवा घरगुती बनवलेले दक्षिण भारतीय पदार्थ ही खात असते. जर तुम्हाला दीपिकी सारखी रोजच्या रोज दिनचर्या पाळलात तर तुमचे ही शरीर निरोगी बनवू शकता.


दीपिका पदुकोणला कमी फॅटमध्ये दूध किंवा उपमा, इडली किंवा डोसा यासारखे कोणतेही दक्षिण भारतीय पदार्थ दोन अंड्यांसोबत खायला आवडतात. दुपारच्या जेवणापूर्वी ती एक कप फळे खात असते आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी 2 चपात्या, मासे आणि ताज्या भाज्या खात असते. तर दुसरीकडे दीपिकाला जास्त उपाशी राहायला नाही आवडत, म्हणून ती संध्याकाळचा नाश्ता म्हणून शेंगदान आणि फिल्टर कॉफी घेते आणि रात्रीच्या जेवणात चपाती, भाज्या आणि कोशिंबीर खाते. याशिवाय दीपिका दर दोन तासाने नॅचरस फ्रेष ज्यूस, नारळ पाणी किंवा स्मूदी पिते.


हे सुद्धा वाचा : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरच्या लेकीनं शेअर केला बेडरुममधला फोटो; 'त्या' गोष्टीनं वेधलं लक्ष


दीपिका आपले शरीर सक्रिय ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करते. तसेच तिचा पर्सनल ट्रेनर यास्मिन कराचीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली पिलेट्ससोबत स्ट्रेचिंग करत असे. यानंतर तिला चार ते पाच सेट फ्री हँड वेट्स करायला आवडतात. दीपिका तिच्या दिवसाची सुरुवात योगासने करून आणि दररोज सकाळ-संध्याकाळ अर्धा तास चालण्याने करते. 


दीपिका पदुकोण डाएट प्लॅन


नाश्ता : नाश्त्यामध्ये दिपिकाला प्रथिनेयुक्त पदार्थ खायला आवडतात. तिच्या नाश्त्यामध्ये अंड्याचा पांढरा आणि एक ग्लास दूध असतं. याशिवाय तिला दक्षिण भारतीय पदार्थही खूप आवडतात.


दुपारचे जेवण: दीपिका पदुकोण दुपारच्या जेवणात 2 चपात्या आणि कोणत्याही हंगामी भाज्या खायला आवडतात. तर दुपारच्या जेवणात ती कधीकधी ग्रील्ड फिश देखील खाते. 


रात्रीचे जेवण: दीपिकाचे रात्रीचे जेवण सहसा हलके असते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या डिनरमध्ये व्हेजिटेबल सूप, चिकन सूप, उकडलेल्या भाज्या आणि सॅलडचा समावेश आहे.