India vs Pakistan 2023 World Cup: भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिअमवर महामुकाबला रंगणार आहे. वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध एकही सामना हरलेला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरही हा विक्रम कायम ठेवायचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या आपल्या सामन्यांमध्ये अनेकदा वडिलांच्या आठवणीत मैदानातच रडला आहे. 16 जानेवारी रोजी हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हिमांशु पांड्या यांचे 16 जानेवारी रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे निधन झाले. (फोटो सौजन्य - Hardik Pandya Instagram)


पांडया ब्रदर्सच्या यशामागे खंबीर बाप 


हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या या दोघांनी क्रिकेट क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. त्यांच्या या यशामागे वडिलांची खूप महत्त्वाची भूमिका आहे. वडिलांचा त्याग बघता या दोघांनीही खूप यश संपादन केलंय. 


गरीबीत गेलं बालपण 


या दोन्ही भावंडांच बालपण अतिशय गरीबीत गेलं आहे. एका मॅगीवर दोन भावंडांनी दिवस काढले आहेत. एवढंच नव्हे तर कुणाकडून उधारीने क्रिकेटचे किट घेऊन या दोघांनी सराव केलाय. पण वडिलांची साथ ठरली अतिशय महत्त्वाची. 



व्यवसाय बंद करण्याचा वडिलांचा मोठा निर्णय 


पांड्या ब्रदर्सच्या वडिलांनी आपला 'कार फायनान्स'चा बिझनेस बंद करून वडोदऱ्याला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हार्दिक 5 वर्षांचा तर क्रुणाल 7 वर्षांचा होता. किरण मोरे क्रिकेट ऍकॅडमीमध्ये वडिलांना दोघांना घेतला प्रवेश. 


वडिलांची साथ ठरली मोलाची 


पांड्या कुटुंबियांची परिस्थिती अतिशय बेताची होती. पण वडिलांनी कायमच मुलांच्या खेळाला प्रोत्साहन दिले. वडिलांनी घरची जबाबदारी मुलांवर न लादल्यामुळे आज दोघंही मोठे यशस्वी खेळाडू आहेत. 2010 मध्ये हार्दिकच्या वडिलांना एका रात्रीत दोनदा हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली होती. यानंतर घरची परिस्थिती खूप खालावत गेली. पण वडिलांच्या मेहनतीने दिवस पालटले. दोन्ही मुलं क्रिकेट क्षेत्रात यशस्वी झाले.


बाप-मुलाचं नातं 


अनेकदा आई आणि मुलांच्या नात्याबद्दल बोललं जातं पण बाप-मुलाचं नातं कायमच अबोल राहिलं आहे. वडील मुलांच्या प्रगतीसाठी, भविष्यासाठी शांतपणे अनेक गोष्टी करत असतात. या गोष्टींची जाणीव मुलांना झाली तर ते नक्कीच वडिलांच्या मेहनतीचं चिज करतात. वडिलांनी कायमच मुलांशी संवाद साधावा. परिस्थितीची जाणीव करून ्द्यावी आणि खंबीरपणे मागे उभं राहावं. 


हार्दिकच्या होम ग्राऊंडमध्ये रंगणार सामना 


वर्ल्ड कप 2023 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान हा 12 वा सामना आहे. जो अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये रंगणार आहे. हार्दिक पांड्याच्या होम ग्राऊंडवर आज सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्याकडून चाहत्यांना अनेक अपेक्षा आहेत.