Social Media Anxiety : आजकाल सगळेच लोकं हे फोन आणि कम्प्युटरमध्ये व्यस्त असतात. कोणी काही काम करत असतं तर कोणी वेळ जाण्यासाठी टाईमपास म्हणून व्हिडीओ बघणं. याशिवाय आपले काही जवळचे लोक असतात ज्यांच्याशी आपण सोशल मीडियाच्या मदतीनं संपर्कात राहतो. त्याशिवाय तुम्हाला माहितीये अनेक लोक हे सतत काहीही नसताना सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. त्यांना कंटाळ आला, ते आनंदात असले किंवा कोणत्याही गोष्टीतून बाहेर पडयाचं असेल तरी ते लगेच सोशल मीडियाचा वापर करतात. त्या लोकांमध्ये तुम्ही देखील आहात का? जे लोक काही नोटिफिकेशन आली की लगेच फोन चेक करतात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्स्टाग्रामवर गेल्या वर्षी एक नवं फिचर आलं होतं त्याचा वापर केल्यास तुम्ही तुमच्या पोस्टला असलेल्या लाइक्सचा नंबर लपवू शकतो. पण तुम्हाला माहितीये का की या फीचरला लॉन्च करण्यामागे इन्स्टाग्रामनं काय विचार केला असेल. दरम्यान, त्याच कारण आहे वाढती सोशल मीडिया एंग्जायटी डिसऑर्डरची वाढती संख्या. त्यामुळे इन्स्टाग्रामनं हे फीचर लॉन्च केलं आहे. मग आता तुम्हाला काही आठवतंय का की तुम्ही कधी फेसबूक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट किंवा कोणत्या सोशल मीडियाचा वापर केला? त्यावर तुमचं उत्तर हे मगाशीच असेल तर आणि तुम्ही देखील सोशल मीडिया एंग्जायटी डिसऑर्डरचे शिकार असू शकतात. 


हेही वाचा : Fun Fact : विमानाच्या खिडक्या मोठ्या का नसतात अन् गोल का असतात?


काय आहे सोशल मीडिया एंग्जायटी?


1. सोशल मीडियावर इतरांच्या पोस्ट पाहिल्यानंतर त्याचे लाइक्स, व्ह्युज आणि शेअर्स पाहून चेंतत पडण?
2. सोशल मीडियाची पोस्ट पाहिल्यानंतर स्वत: ती त्या व्यक्तीशी तुलना करणं. 
3. सोशल मीडियावर ग्रो होण्यासाठी स्वत: ला मित्रांपासून आणि कुटुंबापासून लांब ठेवणं. 
4. आपण फॉलोवर्समध्ये मागे राहू या चिंतेनं किंवा आपले व्ह्यूज वाढतात की नाही याची चिंता करत सतत ते चेक करत राहणं. 
5. तुम्ही जे ही काम करत असाल त्यात तुमचं मन लागत नाही. ते सोडून तुम्ही सतत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चेक करत राहणं.   
6. सोशल मीडियामुळे कोणत्याही कामात लक्ष न लागणं. 


सोशल मीडिया एंग्जायटी कमी करण्यासाठी काय कराल? 


सोशल मीडिया एंग्जायटी कमी करण्यासाठी सगळ्यात आधी इन्स्टाग्राम, फेसबूक किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी लिमिट सेट करणं गरजेचं आहे. हे फक्त फोन आणि कॉम्प्युटरचा वापर कमी केल्यानं होतं नाही.यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही कोणत्या काऊंसिलरची मदत घ्या. त्यासोबत व्यायाम आणि आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलणं आणि भेटण्यानं कमी होईल.