Benefits Of Papaya Seeds In Maharashtra: फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र काही फळं असे आहेत ज्याची सालं आणि बिया आरोग्यासाठी औषध आहेत. पपईहे देखील त्या पैकीच एक आहे. पपई खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहितीये का ज्या पपईच्या बिया टाकावू म्हणून फेकून देतात त्याची मात्र बाजारात मोठी किंमत मिळते. बाजारात पपईच्या बिया दोन हजार रुपयांपेक्षा अधिक किमंतीने विकली जाते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पपईमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्निशियम आढळते. जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पपईच्या बिया पोटासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. पपईच्या बियांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळं पपईच्या बियांचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया. 


पोटासाठी गुणकारी


पपईच्या बिया या पोटासाठी गुणकारी मानल्या जातात. अनेक अभ्यासात समोर आले आहे की, पपईच्या बियांमध्ये प्रोटियोलिटिक एन्झाइम असतात. जे आतड्यातील बॅक्टेरिया मारण्यास आणि पोट साफ करण्यास खूप उपयुक्त असतात. 


कोलेस्ट्रॉल


पपईच्या बियांमध्ये ओलेक अॅसिड आढळते. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करुन कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 


किडणी
पपईच्या बिया किडणीतील विषारी घटक साफ करण्यास मदत करतात. ज्यामुळं किडणीत सूज येत नाही आणि इन्फेक्शनदेखील होत नाही. 


मधुमेह


पपईत अँटीऑक्सिडेंट आणि फ्लावोनोईड असतात. जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. 


लठ्ठपणा


पपईच्या बियांमधील फायबर असते. जे पाचनशक्ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसंच, लठ्ठपणा कमी करण्यासही मदत करतात. 


पपईच्या बियांचे सेवन कसे कराल?


पिकलेल्या पपईतून बिया काढून घ्याव्यात. नंतर त्या सुकण्यासाठी ठेवून द्या. आता बिया पूर्णपणे सुकल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये पावडर करुन घ्या. पपईच्या बियांची पावडर तुम्ही स्मुदीमध्ये वगैरे वापरु शकतो. तसंच, चटणीमध्ये वगैरे टाकू शकता. तसंच, ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही सुकवलेल्या बिया टाकू शकता. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)