Curry Leaves Benefits And Uses: चुकीच्या जीवनशैलीमुळं पाचनसंस्था बिघडते. खराब डाएट आणि तळलेले आणि मसालेदार पदार्थ, फ्राय फूड, जंक फुडचे जास्त सेवन केल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो त्यामुळं पोटही बिघडते. पचनसंस्था बिघडल्याने गॅस, अॅसिडीटी, बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या उद्भवतात. या समस्येवर मात देण्यासाठी काही जण औषधं घेतात. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही एक घरगुती उपाय करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जेवणात फोडणीसाठी कडीपत्ता हा आवर्जुन घालतात. हाच कडीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कडीपत्तामध्ये स्वाद आणि जेवणाचा सुगंध वाढवण्याची क्षमता आहे. कडीपत्ताचे सेवन डाळ आणि भाजीसोबत मिक्स करुन रोज खाल्ले तर पाचनसंस्था सुरळीत होते. आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना जेवणानंतर पोट फुगण्याची समस्या आहे किंवा सतत पोटात गॅस तयार होतो. जर लोक जेवणात कडीपत्ता टाकला तर पाचनदेखील सुरळीत होईल. रोज कडीपत्ता खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. रोज जेवणात डाळ आणि भाजीचे सेवन केले तर कोणते फायदे होतात जाणून घ्या.


कडीपत्ताचे सेवन केल्यास पाचन दुरुस्त होते. या कडीपत्तांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. ज्या लोकांना क्रोनिक बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडीटी आणि डायरियासारख्या समस्या निर्माण होतात. कडीपत्ता आतड्यात साचलेली घाण साफ करतो. ज्या लोकांना भूक कमी लागते त्यांनी कडीपत्त्यांचे सेवन करावे, 


कडीपत्त्याचे सेवन कसे करावे?


कडीपत्ता उन्हात सुकवून घ्या. जेव्हा कडी पत्ती सुकेल तेव्हा हाताने कुस्करुन घ्या. आता एका पॅनमध्ये गरम करुन त्या 3-4 चमचे बडीशेप घालून चांगलं गरम करुन घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका बॉटलमध्ये भरुन ठेवा. आता रोज रात्री जेवल्यानंतर हे मिश्रण खा तसंच, तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणूनही वापरू शकता. 


वजन नियंत्रणात राहते 


कडीपत्तामध्ये कार्बोचोल एल्केलाइड कंपाउंड असते जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते. कडीपत्त्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि फॅट बर्न होते. वजन कम करण्यासाठी 10-12 कडीपत्ता एका ग्लास पाण्यात उकळवून घ्या नंतर पाणी गाळून ते पिऊन घ्या. तुम्ही चहा म्हणूनही ते पिऊ शकता. पाण्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात एक चमचा मध आणि थोडं लिंबूदेखील टाकू शकता. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)