किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
Health Tips In Marathi: बटाटा ही अशी एक भाजी आहे. प्रत्येक पदार्थात बटाटं घातलं जातं. बटाटा वापरुन तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. त्यामुळं बटाटं मोठ्या प्रमाणात घरात उपलब्ध असतात. किराणा भरताना देखील बटाटे स्टोअर करुन ठेवले जातात. मात्र, अनेकदा बटाटे वापरात आले नाही तर बटाट्यांना मोड येतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाल्ल्यास शरीराचे काय नुकसान होते? हे जाणून घेऊया.
मोड आलेले बटाटे आरोग्यासाठी नुकसानदायक
तुम्ही खूप दिवसांपर्यंत बटाटे घरात ठेवलेत तर हळुहळु त्यांना मोड येण्यास सुरुवात होती. त्यामुळं बटाटे तुम्ही नेहमी मोकळ्या जागेत ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरुन त्यांना मोड येणार नाही. एका रिपोर्टनुसार, अंकुर फुटलेले बटाटे खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. त्यामुळं असे बटाटे असतील तर ते फेकून देणे हाच एक उत्तम पर्याय आहे.
मोड आलेले बटाटे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. कारण जेव्हा बटाट्यांमध्ये मोड येण्यास सुरुवात होते तेव्हा त्यात ग्लायकोअल्कलॉइड्स नावाचे रसायन असते. यात विषारी घटक आढळतात. त्याव्यतिरिक्त बटाट्यात सोलनिन आणि चकोनिन नावाचे दोन ग्यायकोअल्कलॉइड्स आढळले जातात. तसं पाहायला गेलं तर बटाट्यात हे दोन घटक आधीच असतात. मात्र, मोड आलेल्या बटाट्यात याची मात्रा अधिक असते.
मोड आलेले बटाटे खाल्ल्यास मळमळणे, उलटी, बद्धकोष्ठता पोटदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागतो. अंकुर फुटलेले बटाट्यांचे सेवन केल्यास डोकेदुखी होण्याची समस्या वाढते. त्या व्यतिरिक्त मधुमेहाच्या रुग्णांसाठीदेखील अशा बटाट्यांचे सेवन आरोग्यासाठी नुकसानदायक आहे. कोंब आलेले बटाटे खाल्ल्यास कमी रक्तदाब व डोकेदुखीही सुरू होऊ शकते.
बटाट्याला मोड येऊ नये म्हणून काय कराल?
बटाट्याला हिरवा रंग दिसत असेल किंवा आधीच कुठेतरी कोंब फुटला असेल तर तो काढून टाका. बटाटे अशा ठिकाणी ठेवा जेथे सूर्याची किरणे पोहोचत नाहीत किंवा ते खूप थंड ठिकाण नाही. बटाटं साठवताना नेहमी कांद्यासारख्या भाज्यांपासून वेगळे ठेवा कारण त्यामुळे बटाट्यांमध्ये उगवण सुरू होते. म्हणजेच जर तुम्ही कांदे-बटाटे एकत्र ठेवत असाल, तर असे करु नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)