Holi 2024 Special Puran Poli Recipe in Marathi : होळी म्हणजे रंगांची उधळण...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जण या सणाची उत्सुकतेने वाट पाहत असतो. रंगांसोबत होळीची अजून खासियत म्हणजे महाराष्ट्रात घरोघरी बनणारी पुरणपोळी (Maharashtrian Style Puran Poli Recipe)...इथे एक वाक्य सहज ओठावर येते होळी रे होळी पुरणाची पोळी...गोड आणि खमंग अशी पुरणपोळीवर ताव मारताना मन तृप्त होतं. पण अनेक वेळा सुगरण बायकांचीही पुरणपोळी फसते. कधी डाळ नीट शिजत नाही, तर कधी गोड कमी होतं. आज आम्ही तुम्हाला मऊ आणि जिभेवर विरघळणारी पुरणपोळीसाठी टिप्स (Holi Special Puran Poli Recipe) सांगणार आहोत. (Holi Special Food Recipe Keep these 5 tips in perfect soft silky performing Maharashtra style Puranpoli)


पुरण शिजवताना ही काळजी घ्या!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरण बनवण्यासाठी चणाची डाळ चाळणीतून चांगली निथळून घ्या. आता एका भांड्यात चणा डाळ, बारीक चिरलेला गूळ किंवा सारख मिक्स करुन ते मंद आचेवर शिजवत ठेवा. गूळ हळूहळू विरघळू लागतं आणि डाळीसोबत एकजीव होतो. हे पुरण मधून मधून फिरवत राहवे अन्यथा ते खाली भांड्याला लागू शकतं. पुरण घट्ट झाल्यानंतर ते गॅसवरुन खाली उतरवावं. डाळीत पाण्याचा अंश राहू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा पाळी फाटते. दुसरीकडे पुरण फार घट्ट झाल्यास ते पोळी लाटताना नीट पसरत नाही. त्यामुळे पुरण पोळी बिघडते. अशावेळी पुरण नीट झालं यासाठी त्यात झारा उभा करावा. तो काही सेकंदसाठी नीट उभा राहिल्यास पुरण योग्यरित्या तयार झालं आहे हे समजावं. सगळ्यात महत्त्वाचं गरम गरम पुरण पुरणयंत्रणेतून काढून घ्यावे. पुरण वाटल्यावर त्यात अत्यंत बारीक वेलची पूड, जायफळपूड आणि चिमूटभर मीठ घालावे. आता या पुरण्यावर पातळ टॉवेल झाकूण ठेवावा. कारण नाही तर पूरण मऊ होतं. 


पुरणाच्या पोळीची कणिक कशी भिजवावी?


पुरण पोळी करण्यासाठी पुरणासोबत त्याची कणिकही तेवढीच महत्त्वाची आहे. पोळी मऊ आणि गुळगुळीत होण्यासाठी गव्हाचं पीठ चाळणीतून नीट चाळून घ्यावं. तुम्ही त्यात थोडं मीठ आणि मैदानाही घालू शकता. काही जण त्यात हळदीही घालतात. हा हे पीठ मऊ आणि सैलभर भिजवून अर्धा तास तसेच ठेवून द्यावे. आता कणीकला तेल आणि पाण्याचा हात घेऊन खूप मळावी. तार सुटेपर्यंत म्हणजे ग्लूटनचं जाळं तयार होतं. अश्या कणीकचे पुरण पोळी मस्त खुशखुशीत होते.  


पातळ पोळी लाटताना हे नक्की करा!


पुरणाची पोळी लाटताना तांदळाचं पीठ घ्यावं. यामुळे पोळी पोळपाटाला चिकटत नाही. आता पोळी करताना नाण्याएवढा कणकेचा गोळा घ्यावा. त्याची छोटी पुरी एवढी पारी लाटून त्यात तिप्पट किंवा चौपट पुरणाचा गोळा भरावा. तांदळाच्या पिठात घोळवून पोळपाटावर हातानं हलके सर्व बाजूंनी थापून पोळी लाटून घ्यावी. 


पुरणपोळी खमंग भाजताना...


महत्त्वाच म्हणजे तव्यावर पोळी वरची बाजू वरच टाकावी. आता मंद आचेवर ती तेल किंवा तूप लावून खरपूस भाजून घ्यावी. दूध, तूप किंवा कटाची आमटीसोबत वाढावी. त्याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा पुरण पोळ्या थंड झाल्यानंतरच त्या डब्ब्यात भरा.