Holi Special How To Make Perfect PuranPoli: होळी म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर येते की पुरणाची पोळी. पुरणाची पोळी दूध आणि कटाची आमटी असा फक्कड बेत जमला नाहीतर मराठी माणसांच्या मनाला जराशी रुखरुखच लागून राहते. पुरणपोळीचा घाट घ्यायचा म्हणजे खूप खटपट करावी लागते. पुरणासाठीची डाळ भिजवा, मग वाटा त्यानंतर मग पोळ्या करा. म्हणजे संपूर्ण दिवसच यात जातो. हल्ली कामाच्या गडबडीत इतका वेळ मिळणं कठिण असते. त्यामुळं हल्ली बहुतेक जण बाहेरुनच पुरणपोळ्या आणतात. पण आज आम्ही तुम्हाला काही पुरण वाटण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरणपोळी बनवण्यासाठी परफेक्ट साहित्याचं परफेक्ट माप असणं गरजेचे आहे. थोडं जरी चुकलं तर पुरणपोळी फसलीच समजा. पुरणपोळीची सुरुवातच होते पुरण वाटण्यापासून कधी कधी पुरणच फसत त्यामुळं मग पुढे पोळी लाटताना ती फाटते किंवा नीट लाटली जात नाही. पुरणपोळ्याही दोन पद्धतीच्या आहेत. एक पीठ पोळी आणि एक तेल पोळी केली जाते. पीठपोळी करताना यात गव्हाच्या कणकेचे पीठ वापरले जाते. तर, तेलपोळी करताना मैदा आणि रव्याचे कणिक मळून ती तेलात तिंबत ठेवावी लागते. मग त्यात पुरण भरुन ते पत्र्यावर लाटली जाते. त्यासाठी पुरण नीट वाटलं गेले पाहिजे. तरत पुरणपोळी नीट होती


पुरण करताना खरी कसरत करावी लागते ती पुरणयंत्रात पुरण वाटताना. पुरण वाटत असताना अनेकदा हात खूप दुखून येतो. तसंच, कधी कधी डाळही थंड होऊन जाते. डाळ थंड झाली की डाळ नीट वाटली जात नाही. पण आता पुरणयंत्रात न वाटताही सोप्या पद्धतीने पुरण वाटून घ्या


पुरण कसे बनवायचे.


पुरण बनवण्यासाठीचे साहित्य


1 कप चणा डाळ, 1 कप किसलेला गुळ किंवा साखर एक कप तेल, वेलची पूड


पुरण बनवण्याची कृती


पुरण बनवताना सर्वात आधी कुकरमध्ये चणाडाळ घाला. त्यानंतर जितकी चणाडाळ घेतली आहे त्याच्या अडीचपट पाणी घालून पाच ते सात शिट्ट्या काढून घ्या. डाळ चांगली शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील डाळ एका भांड्यात काढून घ्या. 


डाळ चांगली शिजल्याची खात्री करुन घ्या. त्यानंतर पावभाजी स्मॅश करण्याच्या भांड्याने डाळ स्मॅश करुन घ्यावी. डाळ गरम असतानाच ती चांगली बारीक करुन घ्या. नाहीतर थंड झाल्यावर वाटणे अवघड होऊन जाते. चणाच्या डाळी व्यवस्थित बारीक करुन घेतल्यानंतर एका भांड्यात काढावी. त्यामध्ये किसलेला गुळ किंवा साखर घालून मध्य आचेवर ठेवावी ठेवावी. लक्षात घ्या की हे मिश्रण सतत ढवळत राहा. पुरण शिजत आल्याचे समजताच त्यात थोडीशी वेलची पूड घालून पुन्हा एकदा ढवळून घ्यावे व मिश्रण थोडे घट्ट झाले की गॅस बंद करुन घ्या. मिश्रण घट्ट झाले आहे का हे ओळखण्यासाठी मिश्रणात एक चमचा उभा करुन ठेवा. जर चमचा तसाच राहिला तर समजा मस्तपैकी पुरण घट्ट झालं आहे. 


टिपः चणाच्या डाळ कुकरमधून काढल्यानंतर जर त्यात पाणी असेल तर आधी पाणी आटवून घ्यावे. मगच पावभाजी स्मॅशरने डाळ बारीक करुन घ्यावी.