Stubborn Child : मुलांमध्ये दिवसेंदिवस बदल होत चालले आहे. एक एक पिढी पुढे जात आहे त्याप्रमाणे त्यांना समजून घेणं पालकांसाठी कठीण होत चाललं आहे. अनेक पालकांची अशी तक्रार असते की, मुलांचा हट्टीपण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांना सांभाळणे कठीण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांसाठी सगळं करूनही ते समाधानी नाहीत. कायम हट्टीपणा करत असतात अशावेळी नेमकं काय करायचं पालकांना समजत नाही. तेव्हा खालील गोष्टी पालकांनी आवर्जून पाळाव्यात. 


जबाबदारी सोपवा 


मुलं जसं मोठ मोठं होत जाईल तशी त्याच्यावर जबाबदारी सोपवा. जसे की, घरातील झाडांना पाणी घालणे, शाळेची स्वतःची बॅग भरणे, कपड्यांच्या घड्या घालणे किंवा आपली खेळणी स्वतःभरून ठेवणे. एवढंच नव्हे तर मुलांना शिस्त लावणे यासारख्या गोष्टी पालकांनी मुलांना करायला लावाव्यात. यामुळे त्यांना जबाबदारीच  जाणीव होते. सोबतच हट्टीपणा देखील कमी होतो. 


कारण सांगा 


मुलांना कायमच का असा प्रश्न पडत असतो. म्हणजे पालक मला हवी ती वस्तू का घेऊन देत नाही. किंवा पालक मला सतत नाही का म्हणतात. तर मुलांना कायमच कारणे समजावून सांगा. चॉकलेट खाऊ नका असं का सांगतात? त्यामागचं कारण समजावून सांगा. तसेच पालक म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही संयमाने हाताळणे अत्यंत गरजेचे असते. 


पालकांनी काय टाळावं 


काही पालक मुलांच्या सगळ्या गोष्टी ऐकतात. त्यांना वाटतं यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होईल, पण असं अजिबात होत नाही. पालकांनी मुलांच्या सगळ्याच गोष्टी ऐकणे टाळा. असे केल्याने मुलांचा हट्टीपणा कमी होतो. एकुलतं एक मुल असलं की अनेक पालक अशा चुका करतात. या चुका पालकांनी आवर्जून टाळाव्यात. 


कुटुंबातील वातावरण 


कुटुंबातील वातावरण मुलांच्या हट्टीपणाला कारणीभूत असल्याचं चित्र अनेक घरात दिसतं. जर घरात पालक सतत भांडत असतील तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. पालक अनेकदा आपल्या मुद्द्यांवर अडून राहतात. हीच गोष्ट मुलं पालकांकडून शिकत अशतात. ते देखील जिद्दी होतात आणि पालकांशी तशाच पद्धतीने वागतात.