उन्हाळ्यात टरबूज, कलिंगडसोबत भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. अनेकदा आपण ही फळे खरेदी करताना आपण फसतो किंवा चुकीचे फळ खरेदी करतो. तेव्हा पैसे खर्च होतात. अशावेळी उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला आराम मिळतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात काकडीची मागणी वाढते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करतो. पण जेव्हा काकडी कडू लागते तेव्हा संपूर्ण चव खराब होते. त्यामुळे काकडी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास कडू काकडी खरेदी करण्यापासून आपण वाचू शकतो. 


सालीवरुन ओळखा 


देशी काकडी चवीला गोड असून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कडू काकडी टाळण्यासाठी, खरेदी करताना त्याची साल काळजीपूर्वक तपासा. जर काकडीच्या सालीचा रंग गडद असेल आणि मध्यभागी पिवळा आणि दाणेदार दिसत असेल तर समजा की ती स्थानिक काकडी आहे. स्थानिक जातीच्या काकडीची चव कडू नसते.


आकाराकडे पण लक्ष द्या 


काकडी खरेदी करताना हे लक्षात ठेवावे लागेल की, तुम्ही खूप मोठी किंवा खूप छोटी काकडी घेऊ नये. तुम्ही नेहमी फक्त मध्यम आकार निवडावा. याशिवाय ते जास्त जाड किंवा पातळ नसावे. मोठ्या आणि जाड काकड्यांमध्ये खूप बिया असू शकतात तर खूप पातळ काकड्या कच्च्या आणि कडू असू शकतात


या काकडी खरेदी करणे टाळा 


काकडी खरेदी करताना इतर काही गोष्टीही लक्षात ठेवाव्यात जसे की हलक्या पिवळ्या रंगाची काकडी शिळी असू शकते. जर काकडी खूप कापली किंवा वाकलेली असेल तर ती खरेदी करणे टाळा. यासोबतच ज्या काकड्यांवर पांढऱ्या रेषा दिसतील अशा काकड्या खरेदी करू नका. कारण ही काकडी स्थानिक नसतात आणि चवीला अधिक कडू असतात.


काकडी खाण्याचे फायदे 


  • काकडी खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि डिहायड्रेशनचा धोका कमी होतो. काकडीमध्ये चांगल्या प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स असतात, त्यामुळे रोज काकडी खाल्ल्याने डिहायड्रेशन टाळता येते.

  • काकडीत व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे दृष्टी सुधारते. आहारात काकडीचा समावेश करून डोळे निरोगी ठेवता येतात.

  • काकडीत आढळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते जे तुमचे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. 

  • काकडीत फायबर मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे अन्न सहज पचते. पोटाशी संबंधित समस्याही याने दूर होऊ शकतात.


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.