अनेकदा मोठमोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये लोक खरेदी करण्यासाठी जातात. त्याठिकाणी असलेल्या ट्रायल रूममध्ये छुपे कॅमेरे लावलेले असू शकतात. अनेकदा शौचालय, हॉटेल रूम इत्यादी ठिकाणी सुद्धा छुपे कॅमेरे लावण्यात आल्याच्या घटना समोर येतात. या छुप्या कॅमेऱ्यांमधून लोकांच्या अत्यंत वैयक्तिक गोष्टी रेकॉर्ड केल्या जातात. तेव्हा मॉलमधील ट्रायल रूम, शौचालयं, हॉटेल रूम इत्यादी ठिकाणी असलेले छुपे कॅमेरे कसे ओळखायचे यासाठी काही सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रायल रूममध्ये गेल्यावर पहिले चारही बाजूंना लक्ष द्या. डेकोरेटिव आयटम, भिंतीवरील घड्याळ, लाइट्स इत्यादी तपासा. अशा ठिकाणी छुपा कॅमेरा लपवला जाऊ शकतो. हेच काम तुम्ही हॉटेल रूम किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना सुद्धा करू शकता. 
 
हॉटेल रूममध्ये फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर, बेड, फ्लावर पॉट, वॉशरूम, ड्रेसिंग टेबल इत्यादी ठिकाणी छुपे कॅमेरे लावलेले असतात.  आरश्यावर कॅमेरा लावला आहे की नाही हे तपासण्यासाठी, काही सेकंड नख किंवा इतर कोणतीही तीक्ष्ण वस्तू आरशावर ठेवा. आरशात दिसणारे नख आणि तुमची खरी नख यांच्यात जर तुम्हाला गॅप दिसली तर समजून जा सर्व काही ठीक आहे. पण जर तुमचं नख आणि आरशात दिसणाऱ्या नखात जर काही गॅप दिसली नाही तर इथे काहीतरी गडबड असल्याचे समजावे. 


हेही वाचा : Chia Seeds: चिया सीड्स 100 टक्के हेल्दी नाहीत! सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम


हॉटेल रूममध्ये आढळणाऱ्या फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा छुपा कॅमेरा लपवला जाऊ शकतो. तेव्हा असे फ्लॉवर पॉट स्वतः तपासा. शक्य असल्यास हे फ्लॉवर पॉट कपाटात ठेऊन द्या किंवा त्याला कपड्याने कव्हर करा. 


तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यानेही छुपे कॅमेऱ्याचे इन्फ्रारेड लाईट्स  सहज ओळखू शकता. असेही काही ॲप्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही छुपा कॅमेरा कुठे आहे हे ओळखू शकता. यासाठी तुम्हाला असे ॲप डाउनलोड करावे लागतील. 


शॉपिंग साईड्सवर हिडन कॅमेरा डिटेक्टर सुद्धा उपलब्ध असून त्याची किंमत 999 पासून ते 499 रुपयांपर्यंत सुरु होते. या डिटेक्टरचा वापर करून तुम्ही हॉटेल किंवा चेंजिंग रूम मधला कॅमेरा सहज शोधू शकता. DEVIL Will Cry हा कॅमेरा डिटेक्टर लेटेस्ट टेक्नोलॉजी सोबत येतो.