Valentine Day साजरा करत असताना प्रत्येकाच्या मनात जोडीदाराबद्दलचं प्रेम ही अतुट भावना असते. पण हे असं प्रेम प्रत्येकाच्या नशीबी असतेच असे नाही. कारण प्रत्येकाला प्रेमात होकारच मिळतो असं नाही. प्रेम ही भावनाच मुळात एकमेकांना सुखी करणारी असते. नकार मिळाला तरी कुणालाही त्रास न देता ही भावना जपणे अतिशय महत्त्वाची असते. कारण प्रेम प्रत्येकाच्या मनातील भावनांचा आदर करतो. आणि शांतता, सुख हेच तर प्रेमाचे मूळ आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकांना आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीमध्ये तो जोडीदार दिसत असतो. ज्याच्यासोबत आपण भावी आयुष्याचा विचार करत असतो. आपलं प्रेम व्यक्त करुनही त्या भावनेचा स्वीकार केला जातो. अशावेळी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही आपलं प्रेम व्यक्त करुनही समोरच्याने ते स्वीकारलं नाही. तर तो नकार कसा पचवाल. आणि नवीन नातं सुरु झालं नाही तरी जुनं नातं अशा 5 गोष्टींनी टिकवून ठेवाल ते जाणून घेऊया. 


अबोला धरु नका 


प्रेम हे स्वीकार करायला शिकवतं. त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा स्वीकार करा. हे केल्याने तुमचं नवं नातं निर्माण होऊ शकत नसलं तरीही जुनं नातं, ती ओळख, ती मैत्री कायम टिकून राहण्यास मदत होईल. कारण कोणतंही नातं सरथ संपवण्यापेक्षा ते जपणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीसोबत अबोला धरु नका. संवाद साधा मन मोकळं करा.. आणि जुनं नातं तसंच टिकवून ठेवा. 


फ्लर्ट करु नका 


तुमच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल कितीही प्रेमाची भावना असली तरीही ते नातं स्वीकारलं गेलं नाही, याची जाणीव राहू द्या. त्यामुळे काहीही बोलताना किंवा फ्लर्ट करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करा. समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. 


स्पेसचा आदर करा 


अनेकदा तुम्ही तुमचं मत मोकळं केल्यानंतरही समोरच्या व्यक्तीला सत्य गोष्टी पचवायला वेळ लागतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला स्पेस द्या. कारण त्या व्यक्तीला भावनाही दुखावल्या गेल्या असतील. त्यामुळे थोडा वेळ देणे कायमच चांगले असते. 


(हे पण वाचा - Valentines Day 2024 : प्रेमाचा बहर... 'या' गोड शब्दांत व्यक्त करा आपल्या प्रेमळ भावना, व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा)


भावनिक नातं घट्ट राहू द्या 


अनेकदा आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर समोरच्या व्यक्तीसोबतचं नातं दुर्लक्षित होऊ शकतं. असं अजिबात करू नका. कारण भावनिक नातं घट्ट असणं गरजेचं असतं. तुमची प्रेम व्यक्त करण्याची भावना अतिशय महत्त्वाची असली तरीही ते नातं अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे नात्यात गुंतागुंत न वाढवता ते रिलेशनशिप जपा. 


नातं पुढे नेताना 


नातं पुढे नेत असताना तुमची मैत्री कायम ठेवा. पण प्रेमाचे ओझे पुढे घेऊन चालू नका. कारण यामुळे तुम्ही मोठ्या भावनिक गुंतागुंतीमध्ये अडकाल. त्यामुळे नातं स्वीकारून पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे.