आजकाल बहुतेक पालकांची एकच तक्रार असते की, त्यांचे मूल मोबाईलसाठी रडत राहते. मोबाईलशिवाय मुलं जेवतही नाही, असा अनेक पालकांचा अनुभव असेल. मुले मोबाईलला चिकटून राहिल्याने त्यांच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. मुलांची फोन वापरण्याची वेळ नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणे हे आजकाल पालकांसाठी सर्वात कठीण काम आहे. यामागे कुठेतरी पालक स्वतःच कारणीभूत असू शकतात. कारण बहुतेक पालक स्वत: त्यांच्या मोबाईलवर सतत काही ना काही करत असतात. मग ते कामामुळे असो किंवा विरंगुळ्यामुळे पण मुलांसमोर मोबाईल पाहणाऱ्याच पालकांचा आदर्श समोर आहे. अशा परिस्थितीत मुलांना मोबाईल फोनच्या अतिवापराच्या सवयीपासून मुक्त करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या मुलाने तुमची आज्ञा पाळली किंवा तुमचं ऐकावं, असं प्रत्येक पालकांना वाटत असते.  पण त्याला कधीच फोन दूर ठेवण्याचा सल्ला देऊ नका. कारण मुलं हे पालकांच्या कृतीतून शिकत असतात.  त्याला समजावून सांगा की, त्याने फोनकडे जास्त पाहिल्यास त्याला कोणते नुकसान होऊ शकते. मोबाईलच्या अतिवापराचे तोटे मुलांना सांगा, पण त्यात खोटे बोलणार नाही याची काळजी घ्या. पालकांनी मुलांना समजावून सांगावं. 


ओरडू नका 


मुलांना ओरडू नका कारण ओरडल्यावर विरोधाला विरोध म्हणून मुलं हट्टी होतात. अशावेळी मुलांचा हट्टीपणा दूर करण्यासाठी खास प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करा. ओरडल्यावर त्यांना पालक आपल्या विरोधात बोलत असल्यासारखं वाटत. ओरडल्यावर मुलं देखील आक्रमक होतात. आपल्याला पटलं नाही तर आपण ओरडून विरोध दर्शवू शकतो असे मुलांना वाचते. 


तुमचा फोन कमी करा


मुलांना मोबाईल वापरायचा नाही, याकरता कधीच ओरडू नका. कारण मुलं हे कायम ओरडल्यावर किंवा विरोध केल्यावर ती गोष्ट अधिक करतात. अशावेळी पालकांनी स्वतःच्या कृतीतून काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत. पालकांनी मुलांना स्वतःसोबत काही नियम लावून दिल्या पाहिजेत. जसे की, जेवताना मोबाईल पाहणार नाही किंवा झोपताना मोबाईल पाहणार नाही. एवढंच नाही तर हा बदल मुलांसोबतच पालकांसाठी फायदेशीर ठरेल. 


इतर गोष्टीमध्ये व्यस्त ठेवा


मुलांना मोबाईल पाहायचा नाही असं सांगता पण त्यावेळी त्यांनी नेमकं काय करायचं? हा प्रश्न मुलांना पडतो. त्यामुळे मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवा. जसे की, खेळ, लहान लहान प्रोजेक्ट, अभ्यास, पुस्तक वाचन, इतर खेळ, खेळणी. महत्त्वाचं म्हणजे पालकांनी देखील मुलांसोबत वेळ घालवावा. त्यांच्यासोबत फिरायला जा म्हणजे मुलं निसर्गातून, खऱ्या आयुष्यातून नव्या गोष्टी शिकतील. 


कमी खाल्ले तरी हरकत नाही


आजच्या पालकांची सर्वात मोठी चिंता ही आहे की त्यांचे मूल मोबाईलशिवाय अन्न खात नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे कोणता पर्याय आहे? त्यामुळे त्याला कमी खायला देण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे, पण त्याला मोबाईलशिवाय खायला सांगा. भुकेने बळजबरीने, तो फोनशिवाय अन्न खाईल, एक-दोनदा नाही तर. जर त्याने त्याच्या फोनकडे जास्त पाहिले तर त्याला काय नुकसान होऊ शकते? मोबाईलच्या अतिवापराचे तोटे मुलांना सांगा, पण त्यात खोटे बोलणार नाही याची काळजी घ्या.


पालकांनी मुलांना वेळ द्या 


मुलांना पालकांचा वेळ हवा असतो. पालक आणि मुलं यांच्यातला संवाद संपला आहे. असं असताना पालकांनी मुलांना वेळ देणे गरजेचे असते. पालकांनी मुलांना खेळायला बाहेर न्यावे तसेच गार्डन या त्यांच्या आवडीच्या ठिकाणी न्या.