How to keep snake away from home : सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा होते. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात. आजकाल प्राण्यांचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेच राहतात इतकंच नाही तर ते सगळ्यात जास्त पाहिले देखील जातात. त्यात सगळ्यात जास्त कोणता प्राणी असतो तुम्हाला माहितीये? तो म्हणजे साप. सापाची माहिती मिळणारी किंवा मग कोणाच्या घरात साप शिरला त्याला पकडण्यात येणारे व्हिडीओ फार व्हायरल होतात. मात्र, हाच साप जर आपल्या घरात शिरला तर? हा विचार करूनच आपल्याला भीती वाटते. त्यात चुकून आपल्या घरात किंवा आपल्या शेजारच्यांच्या घरात साप दिसला तर बापरे ते तर आपण कधी विसरूच शकत नाही. त्यामुळे आपल्या घरात साप यायला नको म्हणून काय करायला हवं हे आज आपण जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सापांबद्दल गैरसमज
सापांबाबत आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत. त्यातही अनेकांचा असा विश्वास आहे की सगळेच साप हे विषारी असतात. मात्र, हे सत्य नाही. आपल्या देशात आढळणाऱ्या सापांमध्ये 20 टक्के हे विषारी असतात. आता याचा अर्थ कुठेही साप दिसला की त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच सर्प मित्राशी किंवा मग फॉरेस्ट डिपार्टमेंटशी संपर्क साधा. 


साप तुमच्या घरात येऊ नये यासाठी करा 'हे' काम
तुमच्या घरात, अंगणात किंवा सोसायटीत कधीही कुठेही साप दिसू शकतो. तुम्हाला हे नको असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायला हवं हे जाणून घेऊया. त्यासाठी तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा मग सोसायटीच्या परिसरात नाग दौना नावाचं एक रोप लावा. या वनस्पतीला एक विशेष वास आहे, जो सापांना जवळ येण्यापासून थांबवतो. 


कुठे आढळते हे रोप?
हे रोप मुख्य:त छत्तीसडग राज्यात आढळते. 


घरात उंदीर येणार नाही याची काळजी घ्या
साप घरात येऊ नये असं वाटत असेल तर घरातील किंवा तुमच्या सोसायटीच्या परिसरात उंदर येणार नाही याची काळजी घ्या. 


गरूड फळ
असे म्हटले जाते की घराच्या किंवा सोसायटीच्या गेटवर गरूड फळ टांगून ठेवल्यानं साप घरात प्रवेश करत नाहीत. हे पाहून साप पळून जातात असा समज आहे. हे एक दुर्मिळ वृक्ष आहे. 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)