How to Make Masala for Tea: थंडीच्या सिजनमध्ये दिवसात कधीही चहा पिण्याची इच्छा होते. मस्त गुलाबी थंडीत गरम कडक मसाला चहा प्यावासा वाटतो. कडक चहा नसेल तर चहाची मजा येत नाही. आले, वेलची आणि दालचिनीसारखे मसाले चहाला कडक बनवण्यास मदत करतात. तर काही लोक त्यांचा चहा अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी चहाचा मसाला वापरतात. चहा मसाला बाजारात सहज उपलब्ध असतो. पण तुम्ही तुम्हाला हवा तेवढा कडक चहा मसाला घरीच बनवू शकता. यामुळे र्दी, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो. आम्ही देत असलेल्या स्टेप बाय स्टेप्स फॉलो करून तुम्ही बाजारात मिळतो तास चहाचा मसाला  घरीही बनवू शकता. चला मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी जाणून घेऊयात. 


मसाला चहा बनवण्यासाठी काय साहित्य लागेल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


लवंग २५ ग्रॅम, वेलची २५ ग्रॅम, काळी मिरी २५ ग्रॅम, दालचिनी २५ ग्रॅम, बडीशेप- १५ ग्रॅम, गुलाबाच्या पाकळ्या- ५ ग्रॅम, सुंठ पावडर- १५ ग्रॅम.


हे ही वाचा: Butter Tea recipe: 'हा' बटर टी तुम्हाला थंडीत देईल वेगळीच एनर्जी, बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या


कसा बनवायचा मसाला चहाची पावडर?


  • चहा मसाला बनवण्यासाठी प्रथम सर्व मसाले भाजून घ्या. 

  • गॅस चालू करा, पॅन गरम करा आणि त्यात लवंगा 2 मिनिटे छान भाजून घ्या. नंतर ताटात काढून घ्या 

  • त्यानंतर वेलची चांगली भाजून घ्या आणि सुगंध आल्यावर ताटात काढा. लक्षात घ्या त्याचप्रमाणे स्टेप बाय स्टेप सर्व मसाले भाजून घ्या. 


हे ही वाचा: Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!


  • त्यानंतर बडीशेप, सुंठ आणि जायफळ भाजून त्यांची बारीक पूड करावी. 

  • त्यानंतर सर्व मसाले थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. 

  • यानंतर जायफळ पावडर आणि सुंठ घालून मसाले पुन्हा एकदा मिक्स करावे.

  • अशाप्रकारे तुमचा चहा मसाला तयार आहे. 


हे ही वाचा: Beetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या


  • मिक्सरमधून काढून हवाबंद डब्यात ठेवा. 

  • जर तुम्हाला जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही मसाल्यांचे प्रमाण बदलू शकता आणि जर तुम्हाला कमी मसाला आवडत असेल तर तुम्ही कमी करू शकता.