नेहमी `बेसन भजी` खाता? काही नवीन खाण्याची इच्छा असेल, तर ट्राय करा ही खमंग खुसखुशीत `मूग डाळीची भजी`
Moong Dal Bahji: आपल्यापैकी कित्येक जणांना रोज काही नवीन खायची इच्छा असते. मग त्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही आता घरातच झटपट एका नव्या प्रकारची मुग डाळ भजी बनवू शकता
Moong Dal recipe: आपल्यापैकी कित्येक जणांना रोज काही नवीन खायची इच्छा असते. मग त्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही आता घरातच झटपट एका नव्या प्रकारची मुग डाळ भजी बनवू शकता, तेही जास्त मेहनत न घेता. मूग डाळीची भजी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. एवढेच नाही तर चवदार आणि पौष्टिकही असतात. मग जाणून घ्या ही भजी बनवण्याची अगदी सोपी पद्धत.
साहित्य/सामग्री
1. एक कप मूगा ची डाळ (सालीसहीत)
2. कांद्याची पात (आवडीनुसार)
3. कांदे, मिरची, लसूण, आले
4. मिठ (चवीनुसार)
5. तेल
6. कोथिंबीर
बनवण्याची पद्धत:
1. मूगाची डाळ रात्रीच भिजत घाला. ही डाळ दोन-तीनदा पाण्याने धुवा, डाळ स्वच्छ करून घ्या.
2. डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या. जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्या.
3. कांद्याची पात आणि कांदे बारीक चिरून घ्या.
4. हिरवी मिरची, आलं आणि लसूण यांची पेस्ट तयार करून घ्या.
5. कोथिंबीर आवश्यकतेनुसार चिरून घ्या.
6. आता हे सगळे साहित्य एका भांड्यात काढून घ्या आणि नीट मिसळा.
7. या मिश्रणात चवीनुसार मिठ घाला.
8. मध्यम फ्लेमवर ही भजी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
9. चटणी किंवा सॉससोबत गरमागरम भजी सर्व्ह करा.