Curd Recipe : कुकरमध्ये बनवा कापता येईल इतकं घट्ट दही, पाहा VIDEO
How to Make Curd at Home : तुम्हाला जर घरच्या घरी घट्ट दही बनवायचा असेल तर काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरुन तुम्ही घरच्या घरी घट्ट आणि मलाईदार दही बनवू शकता.
How to Make Perfect Dahi at Home in Marathi : दही हा भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य घटक आहे. दह्याशिवाय भारतीय जेवण पूर्णच होऊ शकत नाही. पण जर तुम्ही आरोग्याबाबत खूप जागरूक असाल आणि शुद्ध दही खात असाल तर तुम्ही घरीच दही बनवू शकता. घरी बनवलेले दही हेल्दी आणि चविष्ट असते आणि थोड्या प्रयत्नाने ते केळ्यासारखे घट्ट होऊ शकते. आम्ही तुम्हाला घरी दही कसे बनवायचे आणि दही घट्ट करण्यासाठी टिप्स सांगू. जेणेकरून घट्ट, मलईदार दही घरीच बनवता येईल.
तुम्ही जर हॉटेल किंवा बाजारातून खरेदी केले दही पाहिल तर ते खूप घट्ट असतं. ते तयार करण्यासाठी काही कृत्रिम पद्धत किंवा घटक वापरले जाऊ शकतात. घरगुती दही बनवणारे लोक नेहमी तक्रार करतात की घरगुती दही घट्ट होत नाही पण आज आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही दही घट्ट करू शकता. तुम्ही फक्त एकच पदार्थ वापरून घरी दही बनवू शकता. विशेष म्हणजे यात तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, फक्त दोन तासात घरच्या घरी घट्ट दही बनवता येणार आहे.
यूट्यूबवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही खास टिप्स सांगण्यात आल्या आहेत. ज्यामुळे तुम्हाला घट्ट दही करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक कप फुल क्रीम दूध घ्या. त्यानंतर दूध गरम करा. त्यानंतर दूध कोमट होऊ द्या. पूर्णपणे थंड होऊ देऊ नका. या कोमट दुधात तुरटीचा खडा फिरवून घ्या. त्यानंतर तुरटी बाहेर काढा. त्यानंतर त्यात एक किंवा दोन चमचे दही घेऊन तीन मिनिटे मिसळा. त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात हे दूध घेयाचे. त्यानंतर दुधाचे भांड थोड गरम कुकरमध्ये ठेवा. त्यानंतर झाकण लावून हा कुकर उन्हामध्ये दोन तास ठेवा. दोन तासांनंतर जर तुम्ही कुकर उघडल्यानंतर तुम्हाला दही घट्ट झाल्याचे दिसून येईल. हा अनोखा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हिडिओ MadhurasRecipe Marathi या YouTube अकाऊंटवर शेअर केला आहे.