Satguru Parenting Tips : मुलांचं संगोपन करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. आता पालक दोघेही कामावर असतात अशावेळी मुलांची चिंता अधिक असते. मुलं बिघडू नये म्हणून पालक काळजी करतात असतात. अशावेळी सद्गुरु वामनराव पै सांगतात, 'काळजी करु नका, काळजी घ्या.' लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार होणे अत्यंत गरजेचे असतात. ज्या वयात शिस्त लावायची त्या वयात आपण लाड करतो. आणि इथेच पालक सर्वात मोठी चूक करात. पालकांनी नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात हे सांगतात सद्गुरु श्री वामनराव पै. 


मुलं संपत्ती की विपत्ती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच्या काळात अनेक मुलं असायची त्यामुळे पालकांचं त्यांच्याकडे लक्ष नसायचं. पण आता तसं नाही छोटं असं त्रिकोणी कुटूंब अनेक घरात पाहायला मिळतात. अशावेळी आपली मुलं ही आपली संपत्ती बनतात की विपत्ती याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावं. मुलं चांगली निपजली तर संपत्ती वाईट निपजली तर विपत्ती, असं सद्गुरु म्हणतात. हल्ली मुलांचे लाड प्रमाणाबाहेर होतात त्यामुळे ती हाताबाहेर जाण्याचे प्रमाणही अधिक आहे. मुलं जे मागतात ते पालक त्यांना देतात. अनेक पालकांना तर यामध्ये मोठेपणा वाटतो. पण सद्गुरु म्हणतात की, मुलं यामुळेच शेफारतात आणि डोक्यावर बसतात. मुलं जसजशी मोठी होतात तसेच हाता बाहेर जातात. त्यामुळे विशेष काळजी घ्या.


10 वर्षांपर्यंत मुलांचे लाड करु नका


मुलांचे 8 ते 10 वर्षांपर्यंत लाड करु नका. चांगल्या सवयी जितक्या कमी वयात लावता येतील तितक्या लावा. जसे की, दात घासणे, दोरीवरच्या उड्या म्हणजे व्यायम-योगा करणे, चांगल्या सवयी - शिकवण देणे, शिक्षण देणे, सगळ्या गोष्टी त्यांना आता लहान वयातच लावा. या सवयी अंतर्मनात जातात. त्यामुळे त्या कधीच सोडतो म्हटलं तरी सुटणार नाही. त्यामुळे मुलांचे 8 ते 10 वर्षांपर्यंत लाड करणे पालकांना महागात पडू शकते. 



मुलं मोठी होतात तेव्हा लाड करा 


मुलांचे लाड पालक नाही तर कोण करणार. पण हे लाड मुलांना समजायला लागतं तेव्हा करा. कारण या वयात मुलं कळती असतात. एवढंच नव्हे तर त्यांना आपण काय मागतो याची जाणीव असते. पालकांची जबाबदारी खूप मोठी असते. मुलांना जन्म दिल्यावर अत्यंत सुंदर आणि सुरेखपणाने मोठं करणं हे पालकांची जबाबदारी आहे. जर ही मुलं बिघडली तर याचा दोष आई-बापांना लागतो. त्यामुळे पालकांनी देखील सुशिक्षित आणि सुसंस्कारीत असणे गरजेचे असते.