Spider Web Cleaning Tips :  दिवाळी (Diwali) जवळ आल्याने अनेक घरांमध्ये साफसफाई केली जात असेल. दिवाळीच्या साफसफाईत सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे कोळ्याचं जाळं हटवणं. कोळी (Spider) घराच्या कोपऱ्यांमध्ये भिंतीवर तसेच सिलिंगवर जाळी विणतात. या जाळ्यांमुळे घराचा लूक खराब होतो. तेव्हा साफसफाई करताना काही सोप्या आणि प्रभावी टिप्स वापरल्या तर तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 


कोळ्याचं जाळं हटवण्यासाठी सोप्या टिप्स : 


नियमित झाडून काढा :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दररोज घराचा कचरा काढताना किंवा आठवड्यातून एकदा भिंती आणि सिलिंगवरील कोळ्यांची जाळी झाडूने स्वच्छ करा. त्यामुळे कोळ्याच्या जाळ्यांची संख्या वाढणार नाही तसेच घर सुद्धा स्वच्छ राहील.  


व्हिनेगरचा स्प्रे :


व्हिनेगर आणि पाणी हे मिक्स करून तुम्ही ज्या ठिकाणी कोळ्याचे जाळे दिसतील अशा ठिकाणी फवारा. कोळी व्हिनेगरच्या वासाने दूर राहतात त्यामुळे भिंतीवर आणि कानाकोपऱ्यात जाळी होणार नाहीत. 


हेही वाचा : यंदाच्या दिवाळीत तेलाने नाही तर पाण्याने पेटवा दिवे, घरच्या घरी कसे बनवायचे?


इसेंशियल ऑयलचा वापर करा :


कोळ्यांना लॅव्हेंडर, पेपरमिंट किंवा निलगिरी सारख्या तेलांचा वास अजिबात आवडत नाही. या तेलाचे काही थेंब जर तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये टाकले आणि त्यात पाणी मिक्स करून घराच्या कानाकोपऱ्यात शिंपडले तर कोळी तेथे येणार नाहीत आणि परिणामी जाळी सुद्धा बनवणार नाहीत. तसेच सुगंधित द्रव्याच्या वासाने घरभर सुगंध दरवळेल. 


घरातील भेगा भरा :


अनेकदा घराच्या भिंतींवर भेगा पडतात आणि त्या ठिकाणी कोळी अंडी देतात. त्यामुळे घरात कोळ्यांची संख्या वाढते. तेव्हा घराच्या भिंतींवर पडलेल्या भेगा तुम्ही व्हाईट सिमेंट लावून बुजवू शकता. 


ओलाव्याची काळजी घ्या:


ज्या ठिकाणी ओलावा आणि अंधार असेल अशा ठिकाणी कोळी जास्त जाळे बनवतात. तेव्हा घरात अशी काही ठिकाण असतील तर ती नियमित स्वच्छ करत राहा. 


लिंबाचा रस :


लिंबाच्या रसामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात. यामुळे कोळी सुद्धा दूर राहतात. लिंबाचा रस पाण्यात मिसळा आणि त्याची घराच्या कानाकोपऱ्यात फवारणी करा.